वजन कमी करण्यासोबत 'या' आजारांपासून बचावासाठी फायदेशीर योगासनं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:21 AM2020-01-27T11:21:07+5:302020-01-27T11:22:49+5:30
हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर नेहमीच होत असतो.
हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर नेहमीच होत असतो. पण असं अजिबात नाही कि तुम्ही फक्त गोळ्या घेऊनच या समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता. वेगवेगळे घरगुती उपचार केल्यानंतर तुम्ही लहान मोठ्या आरोग्याच्या कुरबुरींपासून सुटका मिळवू शकता. योगासनंं करून तुम्ही सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून सुटका मिळवू शकता. तसंच वजन सुद्धा कमी करू शकता. आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात न जाता तुम्ही घरच्याघरी योगासनं करून अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही योगासनं कोणती आहेत.
या योगासनांमुळे सर्दी आणि खोकला आणि एसिडीटी तसंच कफच्या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळवता येऊ शकते. या योगासनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. योगासनांचा वापर करून तुम्ही सायनससारख्या आजरापासून सुद्धा लांब राहू शकता. तसंच या आसनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.
लेग वॉल पोज
हे आसन करत असताना तुम्हाला खूप चांगलं वाटेल कारण यामध्ये तुम्हाला कोणतेही कष्ट न घेता अनेक फायदे होणार आहे. हा योगासनांचा प्रकार करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी भिंतीच्या आजूबाजूला झोपा. त्यानंतर आपले पाय दोन्ही भिंतीला लावा. नंतर आपल्या मागच्या भागाने जमिनीवरून पायांकडे जोर द्या. या आसनासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागणार नाहीत. असं केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थीत राहिल. तसंच ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-रोज 'हा' पदार्थ खाल्ल्याने कमी होणार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा..)
सेतूबंधासन
सेतूबंधासन करण्यासाठी तुम्ही पाठीवर झोपा. नंतर आपली छाती आणि मान तसंच पाठीचा कणा वरच्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न करा. जर पहिल्यांदा तुम्ही हे आसन करू शकत नसाल तर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. रोज सराव केल्यानंतर तुम्हाला हे आसन करणं सोपं जाईल. यामुळे रक्तदाब, कफ. तसंच दम्याची समस्या कमी होऊ शकते. ( हे पण वाचा-बोटांच्या हालचालीने वेदना होत असेल तर 'या' गंभीर आजाराचा आहे संकेत, वेळीच व्हा सावध!)
स्टॅडिंग फॉर्वर्ड बैंड पोज
हे आसन करण्यासाठी पायांच्यामध्ये अंतर ठेवून हातांना खालच्या दिशेने घेऊन शरीराला तणाव दया. मग त्यानंतर श्वास सोडत पुढच्या बाजूने वाका. नंतर आपल्या हातांना पायांबरोबर जमीनीवर ठेवा. या स्थितीत तुम्ही जितकं जास्त वेळ उभे राहाल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमची नर्वस सिस्टीम चागंली कार्यरत राहील.
शवासन
शवासन करण्यासाठी पाठीवर झोपा नंतर आपली छाती आणि मान वरच्या बाजूने खेचा. पाठीचा आकार खालून सरळ ठेवा. या स्थितीत ३० ते ४० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. मग यामुळे अंगदुखीपासून आराम मिळेल आणि तुमचे मसल्स मजबूत राहतील.