योग प्राणायाम शिबिराची सांगता

By Admin | Published: July 15, 2015 12:15 AM2015-07-15T00:15:01+5:302015-07-15T00:15:01+5:30

नेवासा : येथील कै.सौ.बदामबाई गांधी विद्या मंदिर या शाळेने पन्नास वर्षे पूर्ण केली त्यानिमित्ताने सुवर्णजयंती वर्षानिमित्त आयोजित मोफत योग प्राणायाम शिबिराची सांगता झाली.

Yoga Pranayama Camp | योग प्राणायाम शिबिराची सांगता

योग प्राणायाम शिबिराची सांगता

googlenewsNext
वासा : येथील कै.सौ.बदामबाई गांधी विद्या मंदिर या शाळेने पन्नास वर्षे पूर्ण केली त्यानिमित्ताने सुवर्णजयंती वर्षानिमित्त आयोजित मोफत योग प्राणायाम शिबिराची सांगता झाली.
सात दिवस पहाटे ५-३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आले. या शिबिरात योग शिक्षक व नेवासा तालुका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा डहाळे, मोहिनीराज जाधव, जेऊर हैबती येथील दिगंबर रिंधे, ॲड.अजय रिंधे, शेवगाव पोलीस स्टेशनचे बडे , नगर येथील प्राचार्य ढापसर, उस्थळ दुमाला येथील योग शिक्षक गंगाराम पिटेकर, विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महेश मापारी यांनी शिबिरामध्ये प्राणायाम व योगाचे प्रशिक्षण दिले.
शिबिरात सूर्य नमस्कारासह विविध आसने तसेच अनुलोम विलोम, कपालभाती, बटरफ्लाय प्राणायाम, भ्रामरी, बाह्य प्राणायामासह अनेक आसनांचे प्रात्यक्षिकांद्वारे फायदे विषद केले.
समारोप प्रसंगी ॲड. के.एच. वाखुरे, निरंजन डहाळे, कडूबाळ देशमुख, रूपचंद चोरडिया, रमेश शिंगी, डॉ.लक्ष्मणराव खंडाळे, रवींद्र जोशी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शिबिरार्थींना शाळेच्या वतीने चांगली सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुख्याध्यापिका मृणालिनी मुळे, कर्मचारी रमेश गरूटे, श्रीकृष्ण गवळी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Yoga Pranayama Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.