योगा एक्सपर्टनी सांगितले 'हे' सोपे व्यायाम करून कमी करू शकता चष्म्याचा नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:02 AM2024-05-25T11:02:38+5:302024-05-25T11:03:57+5:30

Eye Exercise : योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून चष्म्याचा नंबर करण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सांगितलं आहे.

Yoga teacher Pranali Kadam told how to improve your eyesight | योगा एक्सपर्टनी सांगितले 'हे' सोपे व्यायाम करून कमी करू शकता चष्म्याचा नंबर!

योगा एक्सपर्टनी सांगितले 'हे' सोपे व्यायाम करून कमी करू शकता चष्म्याचा नंबर!

Eye Exercise : आजकाल लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल झाला आहे. मोबाइल किंवा स्क्रीन टाइम खूप जास्त वाढला आहे. मग ते लहान मुले असोत वा मोठे. सगळेच मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा खूप वापर करतात. ज्यामुळे आजकाल कमी वयातच मुलांना चष्मा लागतो किंवा डोळ्यांसंबंधी आजार होतात. जगभरात डोळ्यांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. आधी क्वचितच कुणाला चष्मा लागायचा. म्हणजे चष्मा लागणं ही वाढत्या वयातील एक समस्या समजली जात होती. पण आता तर खूप लहान वयातही मुला-मुलींना चष्मा लागतो. 

सामान्यपणे लोक चष्मा लागला की, तो दूर करण्याचा किंवा चष्म्याचा नंबर कमी करण्याचा विचारच करत नाहीत. वर्षानुवर्षे लोक चष्मा वापरतात. कुणी जवळचं दिसत नाही म्हणून तर कुणी दूरचं बघण्यासाठी. आज आम्ही तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सांगणार आहोत. योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून चष्म्याचा नंबर करण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सांगितलं आहे. त्यांनी डोळ्यांचे फारच सोपे व्यायाम करून दाखवले आहेत जे तुम्ही सहजपणे करू शकता.

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी एका ठिकाणी मांडी घालून बसा आणि डोळे वर-खाली करा, उजव्या डाव्या बाजूला पाहणे, डोळे हळुवार बंद करणे आणि उघडे, हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर काही सेकंद ठेवणे असे सोपे व्यायाम करून दाखवलेत.

तुम्हाला जर तुमच्या चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर हे व्यायाम सहजपणे करू शकता. हे व्यायाम तुम्ही दिवसातून एकदा जरी केले तरी पुरेसे आहेत. 

Web Title: Yoga teacher Pranali Kadam told how to improve your eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.