दही-भात आरोग्यासाठी उपयुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 10:29 AM2018-03-31T10:29:45+5:302018-03-31T15:59:45+5:30
खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल.
* दही मध्ये अँटीआॅक्सीडेंट,प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट असल्याने रोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खाल्लयास पोटाचे आरोग्य तर सुधारते शिवाय मानसिक आरोग्य सुदृढ बनतं आणि वजनही नियंत्रित राहतं.
* मळमळ होत असल्यास किंवा ताण जाणवतं असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे.हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
* अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.शिवाय आपणास तिखट खाण्याची सवय असेल तर कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही.याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल.
* साध्या दही-भातात,पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल.खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल.
* दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.एका शोधाप्रमाणे दररोज ३०० ग्रॅम दही खायला पाहिजे.तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणा-या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास,अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं.याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.
* शक्यतो रात्री दह्याचे सेवन टाळावे.याने कफ होण्याची शक्यता असते.रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.