शिफ्टमध्ये काम? प्रजनन क्षमतेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:37 AM2023-05-22T05:37:46+5:302023-05-22T05:37:56+5:30

संशाेधनातील निष्कर्ष; अनियमित वेळांचे महिलांवर दुष्परिणाम, विशिष्ट हार्माेन्स घटतात

you are doing Shift work in job? Effects on fertility | शिफ्टमध्ये काम? प्रजनन क्षमतेवर परिणाम

शिफ्टमध्ये काम? प्रजनन क्षमतेवर परिणाम

googlenewsNext

वॉशिंग्टन : नोकरीच्या अनियमित वेळांमुळे अनेकांना आरोग्याविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नव्या संशोधनानुसार कामाच्या अनियमित वेळांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष २५ व्या युरोपीयन एंडोक्राइनोलॉजी कांग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधात मांडण्यात आला. 
मानवी शरीर हे सामान्यपणे २४ तासांच्या दिनक्रमानुसार कार्यरत असते. प्रकाशातील चढ-उतारावरून मानवी शरीर काम सुरू असते. त्यावरून झोपण्या-उठण्याच्या वेळा, हार्मोन्सचे स्रवण, पचनक्रिया, आदी प्रक्रिया सुरू असतात. 

उंदरांवर केली चाचणी
n इन्स्टिट्यूट ऑफ सेल्युलर आणि इंटिग्रेटिव्ह न्यूरोसायन्स आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठाने याचा अभ्यास करण्यासाठी उंदरांच्या दैनंदिन आयुष्यात फेरबदल करण्यात आला. 
n चार आठवडे त्यांचे कालचक्र बदलण्यासाठी त्यांना रात्रीच्या वेळी प्रकाशात, तर दिवसा अंधारात ठेवण्यात आले. उंदरातील ल्युटेलायझिंग हार्मोन्स कमी झाल्याचे तपासणीत आढळले. 
n या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे उंदरातील प्रजननक्षमता कमी झाल्याचे आढळले. त्यावरून महिलांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न
आता मानवी पुनरुत्पादन प्रणालीत बदल घडवून आणणारी अचूक यंत्रणा समजून घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य संशोधक मरीन सिमोनॉक्स यांनी सांगितले.


चार आठवड्यांपर्यंत कामाच्या अनियमित वेळांमुळे मानवी जैविक घड्याळातून ल्युटेनायझिंग हार्मोन्स निर्माण करणाऱ्या किस्पेटिन न्यूरॉन्सवर परिणाम होतो. त्यामुळे थेट प्रजनन क्षमता कमकुवत होत असल्याचे दिसून आले.
- मरीन सिमोनॉक्स, मुख्य संशोधक

मानवी मेंदूच्या मध्यवर्ती भागातील हायपोथॅलामसमध्ये एकप्रकारे जैविक घड्याळ असते.कामाच्या अनियमित वेळांमुळे तसेच जैविक घड्याळातील अनियमिततेमुळे ल्युटेलायझिंग हार्मोन्स कमी झाल्याचे आढळले. 

Web Title: you are doing Shift work in job? Effects on fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.