आयुष्यातील सर्वात आनंदाची दोन वर्षे कोणती? काय सांगतो रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 04:57 PM2018-11-26T16:57:45+5:302018-11-26T16:58:05+5:30
आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यातून अनेक अनुभव येत असून त्याबाबतच्या अनेक आठवणी आपल्या मनात घर करून राहतात.
आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यातून अनेक अनुभव येत असून त्याबाबतच्या अनेक आठवणी आपल्या मनात घर करून राहतात. जेव्हाही आपण कधी मागे वळून आयुष्यात घडलेल्या घटनांकडे पाहतो. त्यावेळी त्या आठवणींमुळे नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. मग ती शाळेतील मस्ती असो किंवा कॉलेजमधील फूल-टू धमाल. आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींपैकी अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. त्या आठवणींमध्ये अनेकदा आपण रमतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयु्ष्यात असे अनेक क्षण येतात जे आपल्या हृदयाच्या फार जवळ असतात. अशातच एका रिसर्चमधून व्यक्तीच्या आयुष्यातील दोन सर्वात आनंदी वर्षांचा खुलासा करण्यात आला आहे.
द सेंटर ऑफ इकोनॉमिक्समार्फत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील 17 ते 85 वयोगट असणाऱ्या 23 हजार व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी या व्यक्तींना त्यांच्या जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये पुढच्या पाच वर्षांत तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करणार? या प्रश्नाचाही समावेश होता. त्यानंतर पाच वर्षांनी याच व्यक्तींचे पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात आले. त्यामध्ये त्यांनी पाच वर्षांपूर्वी ठरविल्याप्रमाणे आनंद उपभोगला की नाही याबाबत विचारण्यात आले.
संशोधनातून अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, व्यक्तीची आनंदाची पातळी वयाच्या 23 आणि 69 वर्षी वाढते. याव्यतिरिक्त वयवर्ष 20 ते 70 दरम्यान आनंदाची पातळी ही कमी असते. निष्कर्षानुसार, व्यक्ती 23 वर्षांची असते तेव्हा अत्यंत उत्साही असते. तिच्या आयुष्याकडून अनेक अपेक्षा असतात. तसेच ज्यावेळी व्यक्ती 69 वर्षांची होते त्यावेळी तिेने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. तसेच कामाचा ताणही नसतो. त्यामुळे ती व्यक्ती शांत आणि टेन्शन फ्री असते.
संशोधनातून असं समोर आलं की, व्यक्ती तरूण असताना आयुष्यातील आनंद वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच प्रौढ व्यक्ती त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा मुलांनी ठरविलेल्या काही गोष्टी करण्यासाठी आई-वडिलांकडून नकार देण्यात येतो. म्हणूनच जेव्हा काही सदस्यांचा पाच वर्षांनी पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठरविल्याप्रमाणे काही झाले नाही. त्यांनी ठरवलेल्या आनंदाच्या सर्व संकल्पना अपूर्णच राहिल्या होत्या.
आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यामध्ये चांगल्या, वाईट अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशातच आनंद किंवा दुःखाचे प्रसंग हे कायमचे टिकत नाहीत. त्यामुळे टेन्शन न घेता आलेल्या संकटांमधून योग्य तो मार्ग काढत आनंदाचा शोध घेत आयुष्य जगायचे असते. शेवटी कोणीतरी सांगितलेच आहे, 'कल किसने देखा है'