वेट लॉससाठी तुम्ही इतकी मरमर करताय, पण उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:42 PM2017-12-28T16:42:17+5:302017-12-28T16:43:42+5:30

तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांपासून नुसतं दूर राहून काही फायदा नाही..

You are trying hard for weight loss, but what is the use? | वेट लॉससाठी तुम्ही इतकी मरमर करताय, पण उपयोग काय?

वेट लॉससाठी तुम्ही इतकी मरमर करताय, पण उपयोग काय?

googlenewsNext
ठळक मुद्देवजन वाढू नये यासाठी अनेक गोष्टींपासून आपण दूर राहतो, पण घात होतोच.विशेषत: आॅफिसमध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आपल्या समोर येतात, जे आपल्याला मनापासून आवडत असतात.या पदार्थांपासून तुम्ही कटाक्षानं दूर राहिलात तरी त्यांनी घात केलेलाच असतो.

- मयूर पठाडे

आपलं वजन आटोक्यात राहावं यासाठी आपण किती आग्रही असतो, त्यासाठी किती आटापिटा करतो.. वजनाच्या काट्यावर उभं राहिल्यावर काटा गरागरा फिरायला लागल्यावर पहिला धक्का जेव्हा बसतो, पोटाचा घेर वाढायला लागतो, तेव्हा अनेक जण अचानक ‘जागे’ होतात, अचानक त्यांना ‘किक’ बसते आणि ते चक्क व्यायामबियाम करायला लागतात, कॅलरी कॉन्शस होतात, खाण्यापिण्यावर बंधनं आणतात.. ज्यांच्यापासून पूर्वी आपण दूर राहू शकत नव्हतो, अशा सगळ्या फूड डिशही आपण टाळायला लागतो.. सगळं काही ताळ्यावर आलंय असं वाटायला लागतं, पण बºयाचदा आॅफिस घात करतं..
ज्या ठिकाणी तुम्ही काम करीत असता, त्याठिकाणी बºयाचदा विकली बर्थडे सेलिब्रेशन्स होत असतात.. केकबिक आणलेला असतो.. आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला थोडा का होईना केक खावाच लागतो.. स्रॅक्सचा तर अनेकदा पूर आलेला असतो.. जेवणाआधीच्या वेळेत आणि बºयाचदा जेवणानंतरच्या वेळेत स्रॅक्स आॅफिसमध्ये येतं. कोणीतरी मागवतं.. हे सगळं पाहून आपल्यालाही काही वेळा ते खावंसं वाटतं. कारण मुळात आपल्याला मनापासून ते आवडतंच असतं.
वेट लॉसच्या बाबतीत आपण अगदीच ‘कट्टर’ असलो, आवडणारी, तोंडाला पाणी सुटणारी कोणतीही गोष्ट समोर आली तरी आपण कटाक्षानं त्याला नकार देत असलो तरीही त्यानं व्हायचा तो घात होतोच. तुमच्या वेट लॉसच्या निर्धाराचे बारा वाजतात ते वाजतातच. यातलं तुम्ही काही म्हणजे काहीही खाल्लं नाही, तरीही.. कारण काही संशोधकांचं, अभ्यासकांचं तर म्हणणं आहे, हे पदार्थ तुम्ही खाल्ले नाही तरी तुम्ही ते खाल्ल्यासारखेच असतात! कारण आवडीचे हे पदार्थ नुसते समोर आल्यानंतर तुमच्या शरीरात जे स्त्राव निर्माण होतात ते आणि तुम्ही हे पदार्थ खरोखरच खाल्ल्यानंतर जे स्त्राव निर्माण होतात ते, सारखेच असतात! त्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाल्ले नाही, तरी त्यानं फारसा फरक पडत नाही!
त्यामुळे निदान आॅफिसमध्ये तरी या पदार्थांना आणि त्या वातावरणाला तुम्ही बळी पडणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी..

Web Title: You are trying hard for weight loss, but what is the use?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.