17 हावभावांच्या मदतीने व्यक्त करता येतो आनंद - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 02:38 PM2019-01-17T14:38:47+5:302019-01-17T14:41:04+5:30
अनेकदा आपण आपल्या भावना सांगून किंवा बोलून व्यक्त करत असतो. पण अनेकांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील गोष्टींचा बऱ्याचदा थांगपत्ता लावणं कठिण होतं.
अनेकदा आपण आपल्या भावना सांगून किंवा बोलून व्यक्त करत असतो. पण अनेकांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील गोष्टींचा बऱ्याचदा थांगपत्ता लावणं कठिण होतं. या व्यक्तींना वाटतं की त्यांनी सांगितलं नाही तर कोणालाही काही समजणार नाही. पण हा त्यांचा गोड गैरसमज असतो, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. कारण आपला चेहरा आपल्या मनातील अनेक गोष्टी एखाद्या आरश्याप्रमाणे व्यक्त करत असतो. त्यामुळे फेस रि़डिंग किंवा चेहरा वाचून अनेक गोष्टी समजणं सहज शक्य होत असतं. असं आम्ही नाही सांगत आहोत... असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे.
तुम्ही तुमचा आनंद शब्दांमध्ये व्यक्त केला नाही तरी चालेल पण तुमचा चेहरा वाचून तुमच्या आनंदाचं खरं कारण समजू शकतं. तुम्हाला माहीत आहे का? मानवी चेहरा 17 प्रकारच्या हावभावांवरून आनंद जाहिर करू शकतो. असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. एवढचं नाही तर संशोधकांनी केलेल्या रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, मानवी चेहऱ्याच्या 16000 पेक्षाही अधिक हावभावांपैकी जगभरामधील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये फक्त 35 प्रकारच्या हावभावांना ओळखलं जाऊ शकतं.
माणूस रागापासून ते दुखः आणि आनंदापर्यंत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावर हजारो प्रकारचे हावभाव आणू शकतो. आपला चेहरा अनेक प्रकारच्या भावनांना व्यक्त करू शकतो. जगभरामध्ये राग दर्शविण्यासाठी चेहऱ्यावर फक्त एकाच प्रकारचे एक्सप्रेशन्स आणण्याची गरज आहे. पण अगदी याउलट आनंद व्यक्त करण्यासाठी 17 प्रकारचे हावभाव मदत करतात.
अमेरिकेतील ओहायो स्टेट यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अलेक्स मार्टिनेज यांनी सांगितले की, हे संशोधन करणं आमच्यासाठी फार इंटरेस्टिंग होतं. संशोधनात सांगितल्यानुसार, आपल्या चेहऱ्यावरून जे आनंदाचे हावभाव किंवा एक्सप्रेशन्स व्यक्त होत असतात. त्यांना ओळखणं सहज शक्य होतं. याबाबतचे उदाहरण सांगायचे झालेच तर, आपल्या हास्याने किंवा आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे आपला आनंद सहज व्यक्त होत असतो.