दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:17 PM2019-01-02T13:17:28+5:302019-01-02T13:20:02+5:30

नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात झाली असून प्रत्येकानेच या नव्या वर्षासाठी काहीना काही संकल्प केले असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण अनेक जण नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करतात.

You can get rid of cigarettes bad habit of you stop drinking alcohol | दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

googlenewsNext

नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात झाली असून प्रत्येकानेच या नव्या वर्षासाठी काहीना काही संकल्प केले असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण अनेक जण नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करतात. अनेक लोक हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात पण काहींना मात्र अजिबात जमत नाही. बऱ्याच जणांना धुम्रपानासोबतच मद्यसेवन करण्याचीही सवय असते. या सवयी अशा असतात ज्या सुटता सुटत नाहीत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, जर तुम्हाला धुम्रपानाची सवय सोडायची असेल तर त्यासोबतच मद्यसेवनाची सवयही सोडावी लागेल. एका नव्या संशोधनानुसार, धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मद्यसेवनाची सवय सोडावी लागेल. त्यामुळे आपोआप तुमची धुम्रपानाची सवय सुटण्यास मदत होते. 

व्यसनांच्या सवयींवर करण्यात आलेले हे संशोधन 'निकोटिन अॅन्ड टोबॅको' या मॅगझिनमधून प्रकाशित करण्यात आले होते. अति मद्यसेवन करणारे लोक जर त्यांच्या या सवयीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले तर त्यांचा निकोटिन मेटाबोलाइट दर कमी होतो. पहिल्या संशोधनातून असं सिद्ध झालं होतं की, अधिक निकोटिन मेटाबोलिज्म दर असणाऱ्या व्यक्ती अधिक धुम्रपान करतात आणि त्यांना ही सवय सोडण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो. 

अमेरिकेमध्ये ओरेगोन स्टेट यूनिवर्सिटीमध्ये सहाय्यक प्रोफेसर सारा डर्मोडीने सांगितले की, कमी मद्यसेवन केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा निकोटिन मेटाबोलिज्म दर कमी झाल्यामुळे त्याला धूम्रपान सोडण्यासाठी मदत करू शकतं. 

सिगारेट सोडण्याच्या काही मिनिटांनी शरीरामध्ये होतात हे मोठे बदल :

1. 20 मिनिटांनी हार्ट रेट होतो नॉर्मल

जेव्हा तुम्ही धुम्रपान करता त्यावेळी तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. तेच जेव्हा तुम्ही धुम्रपान बंद करता त्यावेळी 20 मिनिटानंतर तुमचे हृदयाचे ठोके नॉर्मल होतात. 

2. 60 मिनटांनी ब्लड प्रेशर होतं नॉर्मल 

धुम्रपान सोडल्यानंतर एक तासांनी हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर नॉर्मल स्तरावर येतं. यादरम्यान हाताच्या बोटांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यावेळी तुम्हला चिंता, ताण आणि अस्वस्थ वाटू शकतं. 

3. 12 तासांनंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते

यादरम्यान रक्तामध्ये कार्बन मोनोऑक्साइडची पातळी कमी होते. तेच तुम्ही सिगारेट ओढताना हे शरीरामध्ये जमा होत राहतं. हळूहळू रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते. 

4. एका दिवसात हृदयाचे आजार होण्याचा धोका 70 टक्क्यांनी होतो कमी

सिगारेट सोडल्यानंतर एक दिवसांनंतर हार्ट अटॅकचा धोका जवळपास 10 टक्क्यांनी आणि कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका 70 टक्क्यांनी कमी होतो. ब्लड फ्लो वाढल्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी रक्तप्रवाह हळूहळू वाढू लागतो. म्हणजेच तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. 

5. दोन दिवसांमध्ये भूक वाढते

स्मोकिंग सोडल्यानंतर दोन दिवसांनंतर तुम्ही गंध आणि चवीबाबत सेन्सिटिव्ह होता. याचा परिणाम असा होतो की, जेवणाप्रति तुमची इच्छा वाढते. परिणामी तुमची भूक वाढते. 

Web Title: You can get rid of cigarettes bad habit of you stop drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.