तुम्हाला माहीत आहे का? आपलं वजन मोजण्याचीही वेळ-काळ असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 02:50 PM2019-02-25T14:50:34+5:302019-02-25T14:52:00+5:30

सध्या लहान-थोरांपासून अनेकजण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

You know the right time to weigh yourself | तुम्हाला माहीत आहे का? आपलं वजन मोजण्याचीही वेळ-काळ असते!

तुम्हाला माहीत आहे का? आपलं वजन मोजण्याचीही वेळ-काळ असते!

googlenewsNext

(Image Credit : proteinpower.com)

सध्या लहान-थोरांपासून अनेकजण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच मग वजन कमी करण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येतात. मग काही घरगुती उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचाही वजन कमी करण्यासाठी आधार घेण्यात येतो.  एवढचं कशाला जीम, स्विमिंग, जॉगिंग आणि विविध एक्सरसाइज यांसारख्या गोष्टींचा आधार घेण्यात येतो. जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा आपल्याला अनेकजण दररोज वजन करण्याचा सल्ला देत असतात. जेणेकरून आपलं वजन किती कमी होत आहे किंवा किती कमी करण्याची गरज आहे, हे समजणं सोपं होइल. परंतु याबाबतीत सर्वात मोठं कन्फ्यूजन म्हणजे, आपण दिवसातून किती वेळा वजन करावं? किंवा कधी वजन करांव?

आपल्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न सतावत असतो. कारण एकाच दिवशी वेगवेगळ्या दिवशी वजन केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या वजनामध्ये बराच फरक दिसून येतो. कधीकधी हा फरक अर्धा ते एक किलोचा असतो, तर कधीकधी दोन ते तीन किलोंचं अंतर दाखवण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला या कन्फ्यूजनचं सोल्यूशन आणि त्यावर करण्यात येणारे उपाय दोन्ही गोष्टींबाबत सांगणार आहोत. 

वजन केल्यानंतर तुमचं वजन एकाच दिवसांत अर्धा ते दोन किलोंनी वाढलेलं दाखवतं कारण :

- कधीकधी तुम्ही जेवल्यानंतर तुमचं वजन करता.

- कधीकधी शौचाला न जाता तुमचं वजन करता. 

- तुम्ही जेवताना जास्त मीठ असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले असल्यास शरीरामध्ये वॉटर रिटेन्‍शन (पाणी जमा होणं) होतं आणि त्यामुळ तुमचं वजन वाढलेलं दिसून येतं. 

- वजन करताना तुम्ही जास्त कपडे परिधान केले असतील तरिही तुमचं वजन वाढलेलं दिसून येतं. 

-जर तुम्ही वजन करण्यासाठी वेगवेगश्या मशीन्सचा वापर केला असेल तरिही तुमचं वजन कमी-जास्त प्रमाणात दिसून येतं. 

-  महिलांच्या बाबतीत जर त्यांची मासिक पाळी असेल तर त्यांचं वजन वाढलेलं दिसतं. 

तुम्ही जेव्हा वजन करता त्यावेळी दिसून आलेल्या वजनांमधील फरकासाठी वरिल सर्व कारणं जबाबदार ठरतात. आता प्रश्न उद्भवतो की, वजन कधी करावं? किंवा वजन मोजण्यासाठी योग्य वेळ कोणती?

वजन करण्याची योग्य पद्धत...

- सकाळी शौचास जाऊन आल्यानंतर लगेच वजन करावं. शक्यतो प्रयत्न करा की, वजन करण्याआधी पाणी पिणं टाळा. 

- वजन करताना तुम्ही कमीतकमी कपडे परिधान करा. 

- जेव्हा जेव्हा वजन कराल तेव्हा एकाच मशीनचा वापर करा. 

- जर तुम्हाला सकाळी वजन करणं शक्य होत नसेल तर दररोज वजन करण्यासाठी एकच वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळी वजन करा. 

- महिलांनी मासिक पाळीदरम्यान शक्यतो वजन करणं टाळा.

काही तज्ज्ञांच्या मते, वजन दररोज करण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकाच दिवशी करावं. दररोज वजन मोजून स्वतःला टेन्शन देण्याची गरज नाही. 

Web Title: You know the right time to weigh yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.