मार्केटमध्ये मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स आरोग्यासाठी फायदेशीर?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 06:36 PM2018-07-24T18:36:41+5:302018-07-24T18:36:54+5:30
सकाळी ऑफिसला अथवा शाळेत जाण्याची घाई असते. या धावपळीमध्ये अनेकजण लवकर तयार होतील अशा गोष्टींचा नाश्त्यामध्ये समावेश करतात. यासाठी सर्वात पहिला पर्याय असतो, तो म्हणजे ब्रेड बटर.
सकाळी ऑफिसला अथवा शाळेत जाण्याची घाई असते. या धावपळीमध्ये अनेकजण लवकर तयार होतील अशा गोष्टींचा नाश्त्यामध्ये समावेश करतात. यासाठी सर्वात पहिला पर्याय असतो, तो म्हणजे ब्रेड बटर. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ब्रेड उपलब्ध असतात. अशात हे जाणून घेणं फार कठीण होतं की, आरोग्यासाठी कोणता ब्रेड खाणं चांगलं आहे.
मार्केटमध्ये व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, ग्लूटन फ्री ब्रेड, होल व्हीट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड्स उपलब्ध असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? यातील नेमका कोणता ब्रेड आरोग्यासाठी चांगला असतो? जाणून घेऊयात या वेगवेगळ्या ब्रेडच्या प्रकारांबाबत...
व्हाइट ब्रेड
या ब्रेडमध्ये कॅलरी, कॅल्शिअम, फायबर असतात. हा ब्रेड खाल्यामुळे लिव्हरशी निगडीत आजार होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात राहतं. परंतु याचे जस्त प्रमाणात सेवन करणंही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ब्राउन ब्रेड
अनेकदा डॉक्टर्सही ब्राउन ब्रेड खाण्याचा सल्ला देतात. ब्राउन ब्रेड खाल्यानं शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि फायबर यांसारखे पोषक तत्व मिळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. वजन कमी करण्यासाठीही ब्राउन ब्रेड फायदेशीर असतो.
ग्लूटन फ्री ब्रेड
हा ब्रेड त्या लोकांसाठी असतो, ज्यांना ग्लूटन पचवण्यास जड जातं. हा ब्रेड तांदूळ, बदाम, बटाटे आणि मका यांपासून तयार करतात. त्यामुळे याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण याचे गरजेपेक्षा जास्त सेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
होल व्हिट ब्रेड
हा ब्रेड गव्हापासून तयार होतो. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये व्हिटॅमिन, आयर्न, फायबर मुबलक प्रमाणात असतात. याचं सेवन केल्यानं वजन कमी करण्यास मदत होते.
मल्टिग्रेन ब्रेड
मल्टिग्रेन ब्रेड मध्ये इतर ब्रेड्सच्या तुलनेत जास्त पोषक तत्व असतात. तसेच हा पचायलाही हलका असतो.