तरुण वयातच दिसाल म्हातारे, जर दुर्लक्ष कराल या गोष्टींकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:39 PM2021-06-22T14:39:50+5:302021-06-22T14:40:26+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण तरुणवयातच वृद्ध दिसायला लागतात. वृद्धत्वाची पहिली लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण तरुणवयातच वृद्ध दिसायला लागतात. वृद्धत्वाची पहिली लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात. हे जर नको असेल तर यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यायची जाणून घेऊया...
पुरेशी झोप
पुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर आपण रात्री उशीरा झोपत असाल आणि आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर म्हातारे दिसण्याची चिन्हे लवकर दिसून येतात. या व्यतिरिक्त यामुळे हृदयाशी संबंधित आजार देखील होण्याची शक्यता असते.
धूम्रपान
धूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी तसेही हानिकारक आहे. धूम्रपानामुळे वृद्धत्वाची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. हे आपल्या त्वचेच्या पेशींना खराब करते, ज्यामुळे आपण वयस्कर दिसतो.
रेड वाईनचा उपयोग
रेड वाईन अँटी-ऑक्सिडेंट्सने भरपूर असते जे त्वचेवर अँटी-एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग त्वचेमध्ये कोलेजेन वाढवण्यास देखील होतो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं कमी होतं.
योग्य आहार
आरोग्यदायी आहार न घेतल्याने त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. चांगले अन्न न खाणे, व्यायाम न करणे यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. आपल्या आहारात फळे आणि ज्यूस घ्या. याशिवाय साखर आणि चरबीऐवजी अन्नात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा जास्त प्रमाणात समावेश करा.
ग्रीन टी
चहा पिण्याएवजी ग्रीन ट्राय करा. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे खा. मोड आलेले कडधान्य तसेच भरपूर पाण्याचे सेवन करा.