तुम्ही रोज पाणी पित असाल, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आता जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:18 PM2024-01-02T16:18:04+5:302024-01-02T16:18:28+5:30

Water Drinking Tips : अनेकजण पाणी पिताना काही चुका करतात. या चुका केल्या तर पाण्यापासून शरीराला जास्त फायदा मिळत नाही.

You may be drinking water every day, but do you know the right way to drink water? | तुम्ही रोज पाणी पित असाल, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आता जाणून घ्या...

तुम्ही रोज पाणी पित असाल, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आता जाणून घ्या...

Water Drinking Tips :  पाणी हे आपल्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी नेहमी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. दिवसातून किमान 2 ते 4 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक हा नियम फॉलो करतात. पण अनेकजण पाणी पिताना काही चुका करतात. या चुका केल्या तर पाण्यापासून शरीराला जास्त फायदा मिळत नाही. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर या टिप्स तुमच्यासाठीच आहेत.

काय होतात समस्या?

चुकीच्या वेळेवर, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट दुखू शकतं, पचनक्रियेत समस्या होऊ शकते, डायबिटीसचा धोका राहतो, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, जडपणा, किडनी समस्या आणि सुस्तीसारखी समस्याही होऊ शकतात. प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार सगळ्यांची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही आजारी पडू नये.

दिवसातून किती पाणी प्यावं?

असे मानले जातात की, दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्यावे. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्याने तुमची पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. पाणी पित राहिल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. सोबतच दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहिल्याने जास्त खाण्याची सवयही दूर होते. म्हणजे याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

काय आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत?

सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी आवर्जून प्यावे. आयुर्वेदानुसार, सकाळी काहीही खाण्यापूर्वी पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. असं केल्याने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि शरीराची सफाई चांगली होते. सोबतच सकाळी अनोशा पोटी पाणी प्यायल्याने पोटदुखीपासूनही आराम मिळतो. तसेच जेवण केल्यावर साधारण ३० मिनिटेआधी पाणी प्यावे, याने जेवण सहजपणे पचतं. तसेच जेवण करताना आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

पाणी पिण्याची योग्य वेळ?

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

काय टाळावं?

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

Web Title: You may be drinking water every day, but do you know the right way to drink water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.