केवळ आंबेच नाहीतर आंब्याच्या पानांनी आरोग्याला मिळतात 'हे' फायदे, तुम्हालाही नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:29 PM2024-04-02T12:29:37+5:302024-04-02T12:30:17+5:30
Mango leaves health benefits : आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हालाही माहीत नसतील.
Mango leaves health benefits : उन्हाळा सुरू झाला की, फळांचा राजा आपल्या वेगवेगळ्या प्रजातींमुळे जगभरात चर्चेत असतो. आंबा आंबट-गोड असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आंबे तर सगळेच खातात, पण अनेकांना माहीत नसतं की, आंब्याच्या झाडाची पानेही खूप फायदेशीर असतात. वैज्ञानिक भाषेत आंब्याच्या पानांना मॅंगीफेरा इंडिका नावाने ओळखलं जातं. आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हालाही माहीत नसतील.
आंब्याच्या पानातील पोषक तत्व
1) आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक तत्व असतात. त्याशिवाय यात स्टेरॉयड, एल्कलॉइड्स, राइबोफ्लेविन, थियामिन, फेनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनोइड्स इत्यादीही तत्व असतात. तसेच यात टेरपेनोइड्स आणि पॉलीफेनोल्सही असतं. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो आणि शरीरातील सूज कमी होते.
2) आंब्याची पाने त्वचेवरील सुरकुत्या, डाग आणि कोरडेपणा कमी करू शकतात. याने त्वचेमध्ये कोलेजन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग दूर होतात.
3) आंब्याच्या पानांमध्ये इम्यूनिटी वाढवण्याची शक्ती असते. ज्यामुळे बॅक्टेरियामुळे होणाऱ्या त्वचेच्या इन्फेक्शन आणि जळजळीपासून सुटका मिळते.
4) आंब्याच्या पानांमध्ये डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल संतुलित करण्याचे तत्व असतात. या पानांमध्ये एंथोसायनिडिन नावाचं टॅनिन असतं. जे डायबिटीसच्या सुरूवातीच्या उपचारात मदत करतं.
पानांच्या वापराची पद्धत
1) तुम्ही 10 ते 15 आंब्याची पाने एक कप पाण्यात उकडून घ्या. हे पाणी रात्रभर थंड होऊ द्या आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी याचं सेवन करा.
2) आंब्याच्या पानांचं पावडर पित्त आणि किडनी स्टोनच्या उपचारात वापरलं जातं. किडनी स्टोन तोडण्यासाठी आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी ही पाने मदत करतात.
काही आंब्याची पाने घ्या आणि ते वाळत घाला. यापासून पावडर तयार करा आणि पाण्यात मिक्स करा. पाणी रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी गाळून पिऊन घ्या.