फिट आणि फाइन राहायचंय?; तर कार्टिसोल हार्मोन्सबाबत जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 11:43 AM2019-03-02T11:43:56+5:302019-03-02T11:44:43+5:30

मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक म्हणजे, कार्टिसोल. याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीराच्या दैनंदीन क्रियांमध्ये याची एक महत्त्वाची भूमिका असते.

You must know about cortisol hormones to be fit and fine | फिट आणि फाइन राहायचंय?; तर कार्टिसोल हार्मोन्सबाबत जाणून घ्या!

फिट आणि फाइन राहायचंय?; तर कार्टिसोल हार्मोन्सबाबत जाणून घ्या!

googlenewsNext

(Image credit : Smithsonian Magazine)

मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक म्हणजे, कार्टिसोल. याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीराच्या दैनंदीन क्रियांमध्ये याची एक महत्त्वाची भूमिका असते. शरीरातील कार्टिसोलचे प्रमाण जरा कमी किंवा जास्त झाले तर त्यामुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचा शरीराला सामना करावा लागतो. शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांवर याचा थेट परिणाम दिसून येतो. फक्त कार्टिसोलचे प्रमाण कमी झाले तरच नाही तर याचे प्रमाण वाढले तरिही हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरते. 

नक्की कार्टिसोल म्हणजे आहे तरी काय?

कार्टिसोल म्हणजे एक प्रकारचं स्टेरॉइड असून हे तणावाचं सुरुवातीचं हार्मोन आहे. याचे उत्पादन अंतःस्त्रावी प्रणाली दरम्यान होत असतं. कार्टिसोलचा स्त्राव अधिवृक्कश ग्रंथींच्या माध्यामातून होत असतं. अधिवृक्का ग्रंथी किडनीच्या आजूबाजूला स्थित असतात. यांना स्ट्रेड्स हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीरामध्ये कार्टिसोल हार्मोनचा स्तर 24 तासांमध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात होत असतो.  

लक्षात ठेवा 6 ते 6 ची वेळ 

भूक आणि वजनावर परिणाम करणारे हे हार्मोन्सबाबत एक गोष्ट अशी की, हे हार्मोन्स सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास वाढतात. त्यामुळे भूक लागते आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शरीरातील त्यांची पातळी अर्धी होते. शरीरामध्ये होणारी ही प्रक्रीया योग्य आणि संतुलित समजली जाते. परंतु या प्रक्रीयेमध्ये जेव्हा बाधा येते तेव्हा मात्रा ताण आणि वजन वाढण्यास सुरुवात होते. 

कार्टिसोल हार्मोन्स वाढण्याची लक्षणं

कार्टिसोल हार्मोन्सचं योग्य प्रमाण शरीरातील पचनक्रियेसोबत ब्लड शुगर, फॅटी अॅसिड आणि प्रोटीन मेन्टेन ठेवण्यासाठी मदत करतं. अनेक अशी लक्षणं आहेत ज्यांमुळे आपल्याला हे जाणून घेण्यास मदत होते की, शरीरामध्ये कार्टिसोलचे प्रमाण वाढत राहतं. 
फूड क्रेविंग वाढणं, वजन वाढणं, फॅट वाढणं, हाडांचे घनत्व कमी होणं, सतत मूड स्विंग्ज होणं, चिडचिड आणि राज येणं, विचारात असणं किंवा ताण वाढणं, पचनक्रिया सुरळीत नसणं, स्मरणशक्ती कमी होणं, अनियमित मासिक पाळी, हाय ब्लड प्रेशर, सतत आळस येणं, नेहमीच डोकेदुखीच्या समस्येचा त्रास सहन करणं, अल्सरची समस्या, थकवा येणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. 

आनंदी राहा

शरीरामध्ये कार्टिसोल हार्मोन योग्य प्रकारे काम करण्यासाठी गरजेचं असतं की, तुम्ही तुमचं रूटिन ठिक करा. सर्वात आधी झोपणं आणि उठण्याच्या सवयीमध्ये बदल करा. झोपण्याची सर्वात आदर्श वेळ रात्री 9:30 ते सकाळी 5:30 दरम्यान असते. निरोगी आयुष्यासाठी ही वेळ तुम्ही फॉलो करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आहारातही हेल्दी पदार्थांचा समावेश करावा.

Web Title: You must know about cortisol hormones to be fit and fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.