जरासं चालल्यावरही धाप लागत असेल, तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:03 PM2019-03-14T15:03:31+5:302019-03-14T15:04:49+5:30

अनेकांना थोडीशी धावपळ केल्यावर किंवा थोडसं चालल्यावरही धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर धाप लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं या साधारण गोष्टी नाहीत.

You must know what are the reason of gasping | जरासं चालल्यावरही धाप लागत असेल, तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

जरासं चालल्यावरही धाप लागत असेल, तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Next

(Image Credit : This Quarterly)

अनेकांना थोडीशी धावपळ केल्यावर किंवा थोडसं चालल्यावरही धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर धाप लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं या साधारण गोष्टी नाहीत. जिममध्ये वर्कआउट करताना ज्यावेळी हृदयाची गती वाढते, त्यावेळी धाप लागते. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर थोडसं चालल्यावरही धाप लागत असेल तर हा एखाद्या गंभीर आजाराचाही संकेत असू शकतो. जाणून घेऊया कोणत्या परिस्थितीमध्ये धाप लागणं असामान्य मानलं जातं. तसेच यावरील उपायांबाबतही...

ही आहे हृदयाची सामान्य गती

सामान्यतः लोक प्रति मिनिटामध्य 18 ते 20 वेळा श्वास घेतात. परंतु जिममध्ये वर्कआउटच्या दरम्यान, जॉगिंग करताना किंवा दोरीच्या उड्या मारताना हृदयाची गती वाढू लागते. परंतु, जर काहीही शारीरिक श्रम न करताना धाप लागणं हे हृदय, फुफ्फुसं किंवा रक्ताच्या आजारांची लक्षणं असण्याची शक्यता आहे. 

हृदयासंबंधी समस्‍या :

- रुमॅटिक फिवरचा परिणाम हृदयाच्या वॉल्ववर होतो. यामुळे शरीर किंवा फुफ्फुसांमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही. साधारणतः ही समस्या लहानपणातच होते. 

- काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा त्रास असतो. त्यामुळे या मुलांना थकवा लगेच येतो. त्यामुळे ही मुलं जास्त अॅक्टिव्ह नसतात आणि त्वचा नीळसर दिसते. 

- धाप लागण्याचं आणखी एक कारण हृदयाच्या धमन्या बिघडणं असू शकतं. ज्यामुळे हृदय प्रभावित होतं. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर तणाव येतो आणि धाप लागते. 

- कधी कधी फुफ्फुसांमध्ये रक्ताची गाठ अडकते आणि त्यामुळे धाप लागते. ही गठ हृदय किंवा फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये येते. अशातच रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा स्थितीमध्ये त्वरित उपचार घेण्याची गरज असते. 

- रक्ताची कमतरता असल्यामुळे हृदयावर दबाव येतो ज्यामुळे धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्या होतात. 

Web Title: You must know what are the reason of gasping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.