धुम्रपान तुम्हाला खरंच स्टाइल स्टेटमेंट, मॅनली वाटतं?..
By admin | Published: July 4, 2017 04:47 PM2017-07-04T16:47:36+5:302017-07-04T16:47:36+5:30
ब्रिटनमध्ये ही ‘सवय‘ सक्तीनं मोडून काढण्यात आली आणि मग काय झालं पाहा..
- मयूर पठाडे
धुम्रपान हे पूर्वी एक स्टाइल स्टेटमेंट होतं.. धुम्रपान करणं हे मर्दपणाचं मानलं जात होतं आणि जनमानसात त्याचा रुबाबही होता.. अर्थातच त्याला काही कारणंही होतं. चित्रपटांत, जाहिरातीत हमखास हिरो धुम्रपान करणारा दाखवला जायचा आणि त्याचं उदात्तीकरणही खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचं. त्यामुळे आपणही असंच करावं, असं तरुणांना वाटायला लागायचं. अर्थात हे प्रमाण अजूनही फार कमी झालं आहे, असं नाही, पण धुम्रपान करणारी व्यक्ती ‘मॅनली’ असतेच असं नाही किंवा तसं काही नसतं इतकं तरी लोकांना तरुणांना पटलेलं आहे.
त्यामुळेच आजकाल चित्रपटांत धुम्रपानाचा सिन असला तर ‘धुम्रपान करणं आपल्या आरोग्यासाठी घातक आहे’ अशी स्ट्रीप त्या प्रसंगांत दाखवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदीही घालण्यात आली आहे.
आता कोणी विचारेल, सक्तीनं काय होतं? अशानं काही होतं का? त्यासाठी लोकांची मनं बदलली पाहिजेत आणि त्यांनी स्वत:हूनच तशी कृती केली पाहिजे.
याशिवाय हा निष्कर्ष सांगतो, दहापैकी चार, म्हणजे तब्बल ३८ टक्के तरुणांना धुम्रपानापासून दूर राखण्यात या कायद्यानं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे!
आणि हो, ब्रिटनमध्ये कॅन्सरचं प्रमाणही त्यामुळे खूपच कमी झालं.
सक्तीचाही फायदा होतो तो असा..
कायदा आणि त्याची अंमलबजावणी जर योग्य तऱ्हेनं झाली तर त्याचा फायदा होतोच होतो.. हेदेखील या अभ्यासानं दाखवून दिलं आहे.