कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी काय करावं? 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:01 AM2019-09-21T10:01:19+5:302019-09-21T10:13:31+5:30

सामान्यपणे हृदयासंबंधी आजाराची चर्चा होऊ लागली की, कोलेस्ट्रॉलचा विषय हा निघतोच. कारण कोलेस्ट्रॉल यात महत्वाचा ठरतो.

You Should know about cholesterol and heart disease | कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी काय करावं? 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे...

कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी काय करावं? 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे...

googlenewsNext

सामान्यपणे हृदयासंबंधी आजाराची चर्चा होऊ लागली की, कोलेस्ट्रॉलचा विषय हा निघतोच. कारण कोलेस्ट्रॉल यात महत्वाचा ठरतो. तसेच हृदयरोग आता केवळ वयोवृद्धांना होणार आजार राहिलेला नाही. अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे कमी वयातही हृदयासंबंधी आजार होऊ लागले आहेत. अशात हृदयासंबंधी आजार टाळण्यासाठी जमेल ते प्रयत्न वेळोवेळी आपण करत राहिले पाहिजे. हृदयरोगांचा धोका कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अधिक होतो, अशात कोलेस्ट्रॉलबाबतची माहिती सर्वांनाच असली पाहिजे. चला जाणून घेऊ कोलेस्ट्रॉलबाबत काही गोष्टी....

Cholesterol फक्त धोकादायक नाही

अनेकांना हे माहीत नसतं की, कोलेस्ट्रॉल केवळ घातक असतं असं नाही. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉल वास्तवात एक केमिकल कंपाउड आहे आणि ते आपल्या लिव्हरमध्ये राहतं. याची गरज  नवीन सेल्स तयार करण्यासाठी आणि हार्मोन्स मॅनेजमेंटसाठी असते. पण जर याचं प्रमाण वाढलं तर मग अडचण होऊ लागते.

कधी होते अडचण

(Image Credit : aarp.org)

कोलेस्ट्रॉल वाढण्याचा त्रास कधी होऊ लागतो असा प्रश्न अनेकदा पडतो. तर आपण जेव्हा एखादं असं काम करतो जे आपलं शरीर सहजपणे स्वीकारत नाही. यात फार जास्त प्रमाणात फास्ट फूडचं सेवन, सोबतच ओव्हर इटिंगचाही समावेश आहे. याने लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो.

कसं तयार होतं कोलेस्ट्रॉल?

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती लिव्हरमध्ये होते. पण रोज-रोज हाय कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाल्ले तर याचं प्रमाण हळूहळू वाढू लागतं. आपण जेव्हाही काही खातो तेव्हा कोलेस्ट्रॉल आपल्या आतड्यात सामावतं. त्यामुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं. हे कोलेस्ट्रॉल आपल्या नसांमध्ये, नाड्यांमध्ये जमा होऊ लागल्याने रक्ताचा प्रवाह विस्कळीत होतो.

कसं वाढतं याचं प्रमाण?

(Image Credit : bulletproof.com)

जेव्हाही आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असते, तेव्हा छोट्या आतड्यांकडून शोषलं गेलेलं कोलेस्ट्रॉल शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी लिव्हर काढून घेतं. आणि त्याचा वापर करू लागतात. पण फार जास्त काही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक होऊन शरीरात हार्मफुल कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, ज्याला मेडिकलच्या भाषेत एलडीएल असं म्हणतात. एलडीएल ब्लड सर्कुलेशनला असं बाधित करतं की, हार्ट आणि ब्रेनवर प्रभाव पडू लागतो. ज्याने जीवाला धोका होऊ शकतो.

अचानक कळतं

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढलं याची माहिती अचानक एखाद्या आजाराच्या रूपाने मिळते. कारण हाय कोलेस्ट्रॉलची काही सिस्टीम नसते की, त्यांना ओळखलं जातं. केवळ ब्लड टेस्टच्या माध्यमातून हे कळू शकतं. त्यामुळे वयाच्या २५ वर्षापासून दरवर्षी एकदा पूर्ण बॉडी चेकअफ किंवा ब्लड टेस्ट नक्की कराव्यात.

फक्त हे करा

वाढत्या वयासोबत हृदय आणि मेंदूसंबंधी आजारांचा धोका वाढू नये यासाठी गरजेचं की, तुम्ही तुमच्या आवडीची प्रत्येक गोष्ट खावी, पण कंट्रोलमध्ये खावी. सोबतच नियमित एक्सरसाइजसाठी वेळ काढणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जास्त फास्ट फूड खाऊ नका, तेलकट पदार्थ जास्त खाऊ नका.

Web Title: You Should know about cholesterol and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.