मानसिक आरोग्य बिघडवत आहे FOMO, तुम्हालाही असू शकते ही समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:18 AM2019-12-20T10:18:11+5:302019-12-20T10:23:57+5:30

फोमो म्हणजे 'फिअर ऑफ मिसिंग आउट' किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मागे राहण्याची भिती वाटणे. जर तुम्हालाही अशी भिती वाटत असेल तर तुम्ही मेंटल डिसऑर्डरचे शिकार झाले आहात.

You should know about Fear of missing out or FOMO | मानसिक आरोग्य बिघडवत आहे FOMO, तुम्हालाही असू शकते ही समस्या...

मानसिक आरोग्य बिघडवत आहे FOMO, तुम्हालाही असू शकते ही समस्या...

googlenewsNext

(Image Credit : businessinsider.in)

फोमो म्हणजे 'फिअर ऑफ मिसिंग आउट' किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मागे राहण्याची भिती वाटणे. जर तुम्हालाही अशी भिती वाटत असेल तर तुम्ही मेंटल डिसऑर्डरचे शिकार झाले आहात. सामान्यपणे लोकांना ही समस्या होण्याचं कारण त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स असतात.

तुलना होत राहते

(Image Credit : iamexpat.nl)

मनुष्याचा स्वभावच आहे की, आपण सतत आपली तुलना इतरांशी करत राहतो. आपल्या नेहमी असं वाटत असतं की, दुसऱ्यांकडे ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्यापेक्षा चांगल्या आहेत. आणि याच विचारामुळे आपण स्वत:ला कमी लेखत राहतो. ही समस्या अधिक तेव्हा वाढते जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी नवीन आणि मोठं यश मिळवते.

आपल्यासोबत वाईटच होतं

(Image Credit : sharecare.com)

फोमोचे शिकार लोकांना आपल्या जीवनात आलेल्या छोटया छोट्या समस्या सुद्धा काहीतरी मोठं झाल्यासारखं वाटतात. त्यांना सतत हे वाटत असतं की, जगात जेवढ्या काही समस्या आहेत त्या त्यांच्याच नशीबी आल्या आहेत.

काय होतं यात?

मुळात फोमो ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यात लोकांच्या मनात दुसऱ्या लोकांच्या जीवनातून बाहेर होण्याची किंवा त्यांच्या जीवनात आपलं महत्व कमी होण्याची भिती सतावत असते. या लोकांमध्ये काहीतरी हरवत असल्याची भिती निर्माण होते.

फोमो ही एक कम्पल्सिव डिजायर आहे.  ज्यात दुसऱ्या लोकांच्या लाइफस काहींना सतत जुळून राहण्याची इच्छा होत राहते. खासकरून सोशल मीडिया माध्यमात. अशा लोकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा मास व्हिडीओज द्वारे दुसऱ्या लोकांच्या लाइफमध्ये आपलं महत्व बघणं पसंत असतं आणि लोकांसोबत जुळून राहणं चांगलं वाटत असतं.

लाइक्स आणि रिअ‍ॅक्शनचा गेम

फोमोचे शिकार झालेले लोक सतत सोशल मीडियात हे चेक करत असतात की, दुसरे लोक काय पोस्ट करत आहेत, त्यांच्या जीवनात काय नवीन घडत आहे किंवा आपल्या पोस्टवर लोक कसे रिअ‍ॅक्ट करत आहेत. किंवा पोस्टला किती लाइक्स मिळाले.

वेगवेगळ्या समस्या वाढतात

(Image Credit : khoros.com)

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारांचे शिकार होत आहेत. अशा लोकांना चिंता, मूड स्विंग, एकटेपणा, असुरक्षित, आत्मविश्वासाची कमतरता, सामाजिक असुरक्षिततात, नकारात्मकता आणि डिप्रेशन सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

कशी दूर कराल समस्या?

फोमोमुळे गेल्या काही वर्षात अ‍ॅंटी-डिप्रेशन औषधांची विक्री अनेक पटीने वाढले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सर्वातआधी तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर कमी करा. वास्तविक जगात जगण्याचा प्रयत्न करा. जर तरीही समस्या दूर होत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


Web Title: You should know about Fear of missing out or FOMO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.