केवळ १५ मिनिटात Lyme Disease चं होणार निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:53 AM2019-10-16T09:53:22+5:302019-10-16T09:58:52+5:30

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत डेव्हलप केली आहे, ज्याद्वारे केवळ १५ मिनिटांमध्ये लाइम डिजीज या आजाराचं निदान केलं जाऊ शकतं.

You should know about Lyme disease and its symptoms | केवळ १५ मिनिटात Lyme Disease चं होणार निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार?

केवळ १५ मिनिटात Lyme Disease चं होणार निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार?

googlenewsNext

(Image Credit : patrika.com)

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत डेव्हलप केली आहे, ज्याद्वारे केवळ १५ मिनिटांमध्ये लाइम डिजीज या आजाराचं निदान केलं जाऊ शकतं. या आजाराची लक्षणे ही पूर्णपणे डिप्रेशनच्या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळेच आतापर्यंत या आजाराची ओळख पटवण्यात उशीर लागत होता आणि अनेक टेस्टही करणं गरजेचं होतं. पण आता करण्यात आलेल्या शोधामुळे रूग्णांना आणि डॉक्टर्सना सुविधा होण्याची आशा आहे.

काय आहे लाइम डिजीज?

(Image Credit : towardsdatascience.com)

लाइम डिजीजमध्ये व्यक्तीला सूज आणि लाल चट्टा येतो. हे एक इन्फेक्शन आहे. जे एकी कीटकाच्या चावण्याने होतं. हे सूक्ष्म कीटक व्यक्तीच्या शरीरावर चिकटतात आणि रक्त पितात. त्या व्यक्तीला याबाबत जराही पत्ता लागत नाही. हा आजार Borrelia burgdorferi नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. जर यावर वेळीच उपचार केला गेला नाही तर पुढे जाऊन रूग्णाला न्यूरॉलॉजीक, कार्डिअ‍ॅक आणि रेयूमेटॉलजीकसारखे आजारही होऊ शकतात.

काय सांगतो रिसर्च?

हा रिसर्च कोलंबियाच्या बायोमेडिकल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये करण्यात आला. रिसर्चचे मुख्य प्राध्यापक सेम सिया म्हणाले की, 'आम्हाला या रिसर्चमध्ये आढळलं की, लाइम डिजीज मायक्रोफ्लूइड फॉर्मेटमध्ये डायग्नोज केला जाऊ शकतो आणि यात फार लवकर व चांगला रिझल्ट मिळेल. म्हणजे डॉक्टर्स आता त्यांच्या क्लिनीकमध्येच हा आजार डायग्नोज करू शकतील. यासाठी लॅबमध्ये केवळ दोन तास घालवावे लागतील. रिपोर्ट्ससाठी दोन दिवसांची वाट बघावी लागणार नाही.

हा एक संसर्गजन्य आजार असून  ब्लॅकलेग्ड टिक हा कीटक चावल्याने होतो. हे कीटक शेळ्यांवर आणि कुत्र्यांवरही असतात. सुरूवातीला या आजाराची लक्षणे कळून येत नाहीत आणि जी लक्षणे दिसतात ती डिप्रेशनसारखीच असतात. त्यामुळेच हा आजार गंभीर मानला जातो. कारण या आजाराची ओळख पटवणं सोपं नव्हतं.


Web Title: You should know about Lyme disease and its symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.