जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:47 AM2019-08-27T10:47:46+5:302019-08-27T10:53:45+5:30

जांभई देणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी कंट्रोल केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जांभई देण्याकडे फार कुणी लक्ष देत नाहीत.

You should know health benefits of Yawning | जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे!

जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे!

googlenewsNext

(Image Credit : thesleepdoctor.com)

जांभई देणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी कंट्रोल केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जांभई देण्याकडे फार कुणी लक्ष देत नाहीत. सामान्यपणे जांभई देण्याला झोप किंवा भूकेशी जोडून पाहिलं जातं. मात्र, असं असलं तरी जांभई देण्याचे आपल्या शरीराला काही फायदे होतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे फायदे....

मेंदू थंड होतो

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

thehealthsite.com या हेल्थ वेबसाइटनुसार, जेव्हा कुणी जांभई घेतं तेव्हा तोंड उघडल्यावर थंड हवा श्वासाच्या माध्यमातून आत घेतली जाते. याने मेंदूपर्यंत जास्त ऑक्सिजन जातं. ज्यामुळे मेंदूचं गरम रक्त खालच्या दिशेने फ्लो होणे आणि त्याजागी थंड रक्त पोहोचण्यास मदत मिळते. तसेच याने मेंदूचं एकूणच तापमान कमी होण्यास मदत मिळते.

शरीरात वाढतो ऑक्सिजन फ्लो

(Image Credit :healthline.com)

जांभई दिल्यानंतर आपण जेव्हा मोठा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन शरीरात अधिक प्रमाणात जातं आणि याने शरीरात जमा कार्बन डायऑक्साइड शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते. हे फुप्फुसांसोबत मेंदूसाठीही चांगलं ठरतं. 

अलर्ट राहण्यास मदत

(Image Credit : everydayhealth.com)

सामान्यपणे जांभईला झोपेशी जोडलं जातं, पण तुम्हाला हे माहीत आहे का? की, जांबईमुळे व्यक्तीला अलर्ट राहण्यासही मदत मिळते. जांभई शारीरिक क्रिया श्रेणीत येते आणि जोपर्यंत कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिविटी होत राहते, तोपर्यंत व्यक्ती झोपू शकत नाही. या फिजिकल अ‍ॅक्टिविटीमुळे आजूबाजूच्या गोष्टींबाबत सजग राहण्यास मदत मिळते.

कानातील वेदना दूर करण्यास मदत

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

तुम्हीही अनेकदा हे नोटीस केलं असेल की, फ्लाइटमध्ये अनेकदा एअर प्रेशरमुळे कान बंद होतात, ज्यामुळे कानात वेदना होता. या स्थितीत जांबई दिली गेली तर कान मोकळे होतात आणि वेदना दूर होते. जांभईमुळे कानात तयार होणारं एअर प्रेशर रिलीज होऊ लागतं, ज्यामुळे कानाच्या पडद्यावर दाब येत नाही आणि दुखणंही दूर होतं.

स्ट्रेस रिलीज करण्यास मदत

एका रिसर्चनुसार, मेंदूमध्ये जेव्हा स्ट्रेस होतो, तेव्हा त्यापासून बचाव करण्यासाठी शरीराची पहिली प्रक्रिया जांबई असते. याने मेंदूला टॉक्सिन फ्री करण्यास, प्रेशर रिलीज करण्यास आणि ऑक्सिजन फ्लोच्या माध्यमातून ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा आणण्यास मदत मिळते. याने स्ट्रेस कमी होतो.

Web Title: You should know health benefits of Yawning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.