तोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:35 AM2019-08-14T10:35:01+5:302019-08-14T10:48:08+5:30
तोंडात जर फोडं आलीत तर ना काही खाण्याची इच्छा होत ना काही पिण्याची इच्छा होत. धड शांततेनं बसताही येत नाही.
तोंडात जर फोडं आलीत तर ना काही खाण्याची इच्छा होत ना काही पिण्याची इच्छा होत. धड शांततेनं बसताही येत नाही. जर यावर वेळेवर उपचार केले गेले नाही तर स्थिती अधिक गंभीर आणि वेदनादायी होऊ शकते. तोंडात येणाऱ्या या फोडांना माउथ अल्सर असंही म्हटलं जातं. सामान्यपणे ही समस्या उन्हाळ्यात जास्त होते. तोंडात फोडं आलीत की, तोंडाची चवही गायब होते आणि वेदना होतात.
काय असतात कारणं?
- तोंडाला फोडं शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर येतात. अनेकदा तर डेंटल ट्रिटमेंट घेतांना झालेल्या जखमेमुळेही असं होतं.
- दुसऱ्या व्यक्तीचं उष्ट खाल्ल्यानेही तोंडाला फोडं येतात.
- जर चुकून गालाच्या आतल्या बाजूला कापल्या गेलं आणि जखम झाली तर त्याने माउथ अल्सर होऊ शकतो.
- तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केल्याने तोंडाला फोडं येऊ शकतात.
- उष्णतेमुळेही तोंडाला फोडं येतात.
जर तोंडात फोडं आली असतील असह्य वेदना होत असतील तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. फोडं आपोआप बरे होतील असं अजिबात नाही. त्यासोबतच काही घरगुती उपायांनीही तुम्ही तोंडाला आलेली फोडं ठीक करू शकता.
बर्फ आणि टी बॅग
तोंडात आलेल्या फोडांवर बर्फ लावल्याने बराच फायदा मिळतो. त्यासाठी बर्फाचा तुकडा काही वेळासाठी तोंडात ठेवा किंवा फोडावर लावा. त्यासोबतच टी बॅग्सने सुद्धा तोंडात आलेल्या फोडांपासून आराम मिळतो.
बेकिंग सोडा
तोंडात आलेली फोडं दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचाही वापर केला जाऊ शकतो. बेकिंग सोड्याने केवळ वेदनाच कमी होतात असं नाही तर अल्सर अॅसिडचा स्तर कमी करून फोडं ठीक करण्यात मदत मिळते. यासाठी बेकिंग सोड्यात काही थेंब पाणी टाकून पेस्ट तयार करा आणि फोडांवर लावा. काही वेळाने गुरळा करा.
खोबऱ्याचं तेल
तोडांची फोडं बरी करण्यासाठी खोबऱ्याचं तेल अधिक फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-मायक्रोबिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात, जे फोडं दूर करतात आणि वेदनाही कमी करतात. यासाठी तोंडात आलेल्या फोडांवर रोज खोबऱ्याचं तेल लावा.
केळं आणि मध
पिकलेल्या केळ्यात मध मिश्रित करून तोंडातील फोडांवर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल.
तूप
(Image Credit : www.realsimple.com)
तोंडात आलेली फोडं ठीक करण्यासाठी तूपाचा फार फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी तूप फोडांवर लावा. सकाळपर्यंत तुम्हाला आराम मिळेल.
लसूण
लसूण हा माउथ अल्सरसाठी सर्वात चांगला उपाय मानला जातो. लसणाच्या दोन-तीन कळ्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तोंडातील फोडांवर लावा. नंतर थंड पाण्याने गुरळा करा. तुम्हाला आराम मिळेल.