आल्याचा चहा पिण्याचे फायदे माहीत असतीलच आता नुकसान जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:50 AM2019-11-01T10:50:33+5:302019-11-01T10:56:44+5:30
हिवाळ्यात अनेकदा लोक सर्दी-खोकला, घशातील खवखव, ताप यांसारख्या समस्यांनी हैराण असतात. अशात अनेकजण सर्वातआधी आल्याचा चहा पिण्याची इच्छा व्यक्त करतात.
(Image Credit : lovehaswon.org)
हिवाळ्यात अनेकदा लोक सर्दी-खोकला, घशातील खवखव, ताप यांसारख्या समस्यांनी हैराण असतात. अशात अनेकजण सर्वातआधी आल्याचा चहा पिण्याची इच्छा व्यक्त करतात. आल्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण याचं जास्त सेवन केलं तर याचे शरीरावर काही साइड इफेक्टही होऊ लागतात. तुम्ही दिवसभरात चार ते पाच वेळा आल्याचा चहा घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण याचं अधिक सेवन तुम्हाला महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ आल्याच्या चहाचं अति सेवन केल्याने होणाऱ्या साइड इफेक्ट्सबाबत...
जळजळ होण्याची समस्या
(Image Credit : hcah.in)
आल्याच्या चहाचं अधिक सेवन केल्याने तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला जळजळ, डायरिया आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते. याने पोटात अॅसिडची निर्मिती होते आणि नंतर तुम्ही अॅसिडिटी. डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांनी आल्याचं सेवन करू नये.
झोप उडू शकते
(Image Credit : verywellmind.com)
आल्याचा चहा अधिक प्यायल्याने अस्वस्थता आणि झोप न येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी आल्याचा चहा अजिबात घेऊ नये. याने छातीत जळजळ सुरू होते. ज्यामुळे झोप येत नाही.
सर्जरीआधी घेऊ नका आल्याचा चहा
कोणत्याही मेडिकल सर्जरीआधी आल्याचा चहा पिणं चांगलं नसतं. कारण आलं बेशुद्ध होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधासोबत रिअॅक्शन करतं. त्यामुळे डॉक्टर सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी आल्याच्या चहाचं सेवन बंद करण्याचा सल्ला देतात.
हीमोफिलिया होऊ शकतो
रक्त पातळ करणारं कोणतंही औषध घेत असाल तर आल्याच्या चहाचं सेवन करू नये. यात आयब्रूफेन आणि अॅस्प्रिन सारखी औषधे असतात. आल्याची जेव्हा ब्लड प्लेटलेट्ससोबत क्रिया होते, तेव्हा हीमोग्लोबिन गोठू लागतं. आल्याचं सेवन केल्याने लोकांमध्ये हीमोफिलिया सारखा रक्ताचा आजार होऊ शकतो. त्यामुळे आल्याचा चहा घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोट होतं खराब
अनोशापोटी आल्याच्या चहाचं सेवन केल्याने पोट खराब होतं. आल्याच्या चहाचं योग्य प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असतं. अशात हे सांगणं अवघड आहे की, या समस्येपासून सुटका होण्यासाठी आल्याचा चहा किती प्रमाणात घ्यावा.