Fridge मध्ये पदार्थ स्टोर करताना टाळा या चुका, पडू शकतात महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:47 AM2023-07-24T09:47:13+5:302023-07-24T09:47:54+5:30
Health Tips : भलेही फ्रिज आपल्या वेगवेगळ्या कामात येत असेल, पण याच्या वापराबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर तुम्ही अनेक आजारांचे शिकार व्हाल.
How To Keep Foods In Refrigerator: फ्रिज आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय बरेच अडथळे निर्माण होतात. आजच्या धावपळीच्या जीवनात फ्रिजचं महत्व अधिकच वाढतं. भलेही फ्रिज आपल्या वेगवेगळ्या कामात येत असेल, पण याच्या वापराबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर तुम्ही अनेक आजारांचे शिकार व्हाल. चला जाणून घेऊ फ्रिजमध्ये जेवण स्टोर करताना काय काळजी घ्यावी.
1) गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवू नये
तुम्ही नेहमीच तुमच्या घरातील मोठ्या लोकांकडून ऐकलं असेल की, गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण यातून वाफ निघत असते आणि याचे थेंब फ्रिजमध्ये चिकटतात. फ्रिजमधील मॉइस्चरमुळे अन्न खराब होतं. ज्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग होण्याचा धोका असतो. अशात गरम अन्न आधी नॉर्मल होऊ द्या, नंतर ते फ्रिजमध्ये ठेवा.
2) कापलेली फळं-भाज्या
बरेच लोक कापलेली फळं किंवा भाज्या फ्रिजमध्ये ठेवतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. कापलेली फळं फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातील ओलावा जातो. तसेच यातील पोषक तत्वही नष्ट होतात.
3) प्लास्टिकचे डबे टाळा
आजकाल प्लास्टिकच्या डब्यांचा वापर अधिक केला जातो. त्याशिवाय आपलं काम भागत नाही. हे डबे फ्रिजमध्ये ठेवण्यासाठीही वापरले जातात. पण जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट हे डबे न वापरण्याचा सल्ला देतात. कारण प्लास्टिकमध्ये जेवण ठेवल्याने त्यातील न्यट्रिएंट्स नष्ट होतात. त्याऐवजी तुम्ही माती, काच किंवा स्टीलचे डबे वापरू शकता.