भिजवलेले मनुक्यांचं हे खाप पाणी अनेक समस्या करतं दूर, जाणून घ्या कधी आणि कसे प्यावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:09 PM2024-04-11T13:09:26+5:302024-04-11T13:14:14+5:30

Soaked Raisins Health Benefits :शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. ते म्हणजे भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी.

You will be speechless after reading the benefits of eating soaked raisins and drinking water, know when to drink! | भिजवलेले मनुक्यांचं हे खाप पाणी अनेक समस्या करतं दूर, जाणून घ्या कधी आणि कसे प्यावे!

भिजवलेले मनुक्यांचं हे खाप पाणी अनेक समस्या करतं दूर, जाणून घ्या कधी आणि कसे प्यावे!

Soaked Raisins Health Benefits : आजकाल लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या चुकांमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बरेच लोक सतत आजारी पडतात आणि काही लोक तर गंभीर आजाराचे शिकार होतात. आजकाल लोक खूप तळलेले पदार्थ खातात, फास्ट फूड खातात आणि एक्सरसाईज अजिबात करत नाहीत. त्यासोबतच स्मोकिंग आणि मद्यसेवनही खूप करतात. ज्यामुळे लिव्हर आणि किडनी खराब होतात. अशात शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. ते म्हणजे भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी. चला जाणून घेऊ लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

भिजवलेल्या मनुक्याच्या पाण्याचे फायदे

मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. मनुके एनर्जी असलेलं एक लो फॅट फूड आहे. ज्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेकप्रकारचे फायदे होतात.

कसं कराल तयार?

हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी 2 कप पाणी घ्या आणि 150 ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे 150 ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. 2 कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. 20 मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.

सेवन करण्याची योग्य वेळ?

सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ 3 दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

काय आहेत याचे फायदे?

1) मनुक्याच्या पाण्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो.

2) या पाण्यात अमिनो अ‍ॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.

3) मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते.

4) तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देतं.

5) मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात.

Web Title: You will be speechless after reading the benefits of eating soaked raisins and drinking water, know when to drink!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.