Heart Attack: हार्ट अॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:09 PM2022-06-01T15:09:53+5:302022-06-01T15:10:14+5:30
केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत.
हार्ट अॅटॅक हा असा आहे जो कोणत्याही वयात 'हल्ला' करतो. परंतू तो सांगून करतो. म्हणजेच हार्ट अॅटॅक येणार याची लक्षणे काही वेळ किंवा दिवस आधीपासून दिसू लागतात. बहुतांश मृत्यूंचे कारण हे हार्ट अॅटॅकच असते. सुप्रसिद्ध गायक केकेचा देखील कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला आणि अवघे चाहते शोक सागरात बुडाले.
या घटनेवेळी केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत. यात त्याला घाम येत होता, ऑडिटोरिअममध्ये एसी सुरु नव्हता, गर्दी खूप होती वगैरे. परंतू, अॅटॅक येण्याआधी शरीर काही संकेत देत असते. ते नेमके काय आहेत? आपल्या ते वेळीच लक्षात आले तर जीव वाचू शकतो.
ही लक्षणे कोणती?
- डोके दुखणे
- चक्कर येणे
- श्वास घेण्यास त्रास
- दमायला होणे
- गॅसचा त्रास होणे
-दरदरून घाम फुटणे
कसे वाचावे...
जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसून आले तर अजिबात वेळ वाया घालवू नका. लागलीच डॉक्टरकडे जावे. अनेकदा रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, यामुळे जिव वाचणे कठीण होऊन जाते. अशी छोटी छोटी लक्षणे दुर्लक्षून चालणार नाहीत. यामुळे वेळीच डॉक्टरकडे जावे व तपासणी करून घ्यावी. तसेच घाबरूनही जाऊ नये.