तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:59 AM2020-09-09T11:59:04+5:302020-09-09T12:05:16+5:30

तरूणांमध्ये कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी वाढला आहे. काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढत जातो. 

Young people at more risk for colorectal cancer how to spot the signs | तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

Next

वाढत्या वयात शरीराला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. तुमचं वय ५० पेक्षा कमी असेल तरीही तुम्ही जीवघेण्या आजारांच्या जाळ्यात अडकू शकता. कारण सध्याची  बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे मोठ्या संख्येनं तरूण वयातही आजारांचा सामना करावा लागतो. अलिकडे करण्यात आलेल्या सर्वेनुसार मागच्या दशकाच्या तुलनेत तरूणांमध्ये कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी वाढला आहे. काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढत जातो. 

२००४ मध्ये एका अभ्यासासाठी ५० वर्षापेक्षा कमी वयोगटातील जवळपास १ लाख ५०  हजार लोकांचे चेकअप करण्यात आले होते. २०१५ पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत गेली. २००४ मध्ये कोलोरेक्टल कॅन्सर १० टक्के तरूणांमध्ये दिसून आला होता तर २०१५ मध्ये हे प्रमाण वाढून १२.२ टक्के झाले होते. एका रिसर्चनुसार  २०३० पर्यंत २० ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये  कॅन्सरचा धोका वाढून कॅन्सरपिडीतांची संख्या  १२४ टक्क्यांनी वाढणार आहे. कॅन्सरमुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये  महिला आणि पुरूषांचासुद्धा  समावेश आहे.

तरूणांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका

तरूणांमध्ये वाढणारा कॅन्सराचा धोका चिंतेचा विषय बनलं आहे. या आजारावर उपाय करण्याआधी  हा आजार होण्याच्या कारणं माहीत असायला हवीत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनमुसार अनुवांशिकतेनंही हा आजार पसरतो. जास्तीत जास्त लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता पसरवायला हवी. सुरूवातीच्या स्टेजला या आजाराबाबत माहिती मिळाल्यास जीव वाचवणं शक्य होऊ शकतं.  

पोटाचा कॅन्सर हा लठ्ठणामुळेच अनेकदा उद्भवतो. याला इतरही अनेक कारणे असतात. यात वातावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच तंबाखूचं सेवन आणि केमिकली प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टचं सेवन यामुळेही कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. पण जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक मोठी समस्या आहे. यामुळेही कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.

तुम्ही केवळ चांगले आणि दिसावे म्हणून वजन कमी करणेच महत्त्वाचे नाही तर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठीही वजन कमी करणे गरजेचे आहे. लठ्ठपणाला कारणेही तितकीच वेगवेगळी आहेत. जंक फूड, जेवणाच्या अनियमीत वेळा, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, शारीरिक हालचाली कमी होणे, व्यायाम न करणे, एकाच जागी बसून काम करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील. 

लक्षणं

डाएटींग न  करता वजन कमी होणं

जर तुम्हाला भूक कमी लागत असेल किंवा दिवसेंदिवस वजन कमी होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. कारण या आजारात काहीही खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही परिणामी वजन वेगानं कमी होतं. 

थकवा येणं

या आजारानं पिडित असलेल्या लोकांना थकवा जास्त येतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यानं  सतत ताप येणं, अंगदुखी, अशक्यपणा येतो. 

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल

अचानक खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊन शारीरिक स्थिती खालावते.  जेवणाच्या वेळी भूक लागत नाही. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. या आजारात त्वचेचा आणि रक्ताचा रंगही बदलतो. कंबरदुखीची समस्या जाणवते. तुम्हालाही अशी समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

हे पण वाचा-

मोठा धक्का! एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर ऑक्सफोर्डनं कोरोनावरच्या लसीची चाचणी थांबवली

खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार

Web Title: Young people at more risk for colorectal cancer how to spot the signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.