बॉडी बनवण्याचं तुम्हाला वेड आहे? मग ही बातमी वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 01:05 PM2018-05-02T13:05:18+5:302018-05-02T13:05:18+5:30
जीम इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यावरून हाय प्रोटीन डाएट, स्टेरॉइड्स आणि हार्मोन्सचे इजेक्शन घेतात.
मुंबई- तरुणाईचा सध्या बॉडी बनविण्याकडे जास्त कल आहे. जीममधील वर्कआउटबरोबरच डाएट, प्रोटीन्स अशा सगळ्याचा वापर करून बॉडी बनविण्याच्या नादात तरूणाई पाहायला मिळते. सिक्स पॅक अॅब्स बनविण्यासाठी किंवा शरीराच्या विशिष्ट भागावरील मांसपेशी वाढविण्यासाठी जीम इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यावरून हाय प्रोटीन डाएट, स्टेरॉइड्स आणि हार्मोन्सचे इजेक्शन घेतात. पण या सगळ्याचे दुष्पपरिणाम समोर येतात. अल्पकाळात बॉडी बनविण्याच्या नादात केलेल्या गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या थेट किडनीवर होत असून किडनी निकामी होण्याच्या घटना समोर येत आहेत.
सिक्स पॅक अॅप्स करण्यासाठी जीममध्ये केला जाणारा व्यायाम, स्टेरॉइड्स आणि हार्मोन्सच्या इंजेक्शनचा वापर हे किडनी निकामी होण्यामागील महत्त्वाचं कारण आहे. किडणीचे आजार झालेल्या रूग्णांनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण आणि परीक्षण करून ही बाब समोर आली आहे.
शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांचं प्रमाण कमी आहे. पण बॉलिवूडच्या कलाकाराप्रमाणे सिक्स पॅक्स अॅप्स करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं मत नेफ्रॉल्जिस्ट डॉ. जितेंद्र कुमार यांनी व्यक्त केलं आहे.