तुमची मुलं राहतील तंदुरुस्त जर आहारात समाविष्ट कराल 'हे' पदार्थ, वजनही वेगाने वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 02:21 PM2021-06-18T14:21:37+5:302021-06-18T14:22:29+5:30
तुमचे मुलं जर नीट जेवत नसेल तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडू शकतात. बरेचदा असे होते की मुलं काही पदार्थ बघुन नाकं मुरडतात. खाण्यास नकार देतात. पण इथेच पालक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते पदार्थ खाऊ घाला.
तुमच्या लहानग्यांना चांगले अन्न देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. त्यांना वेळेत लागणारा आहार पोषक तत्वांनी समृद्ध असावा ही जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचे मुलं जर नीट जेवत नसेल तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडू शकतात. बरेचदा असे होते की मुलं काही पदार्थ बघुन नाकं मुरडतात. खाण्यास नकार देतात. पण इथेच पालक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते पदार्थ खाऊ घाला. लहानमुलं तंदरुस्त राहण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पदार्थ सांगणार आहोत जे लहान मुलांच्या आहारात असलेच पाहिजेत.
डाएट एक्सपर्ट डॉ रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनुसार खालील गोष्टी मुलांच्या आहारात समाविष्ट कराव्यात...
डाळीचे पाणी
डाळ ही पोषक तत्वांनी समृद्ध असते. त्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तुमचे मुलं जर अशक्त असेल तर त्याला डाळीचे पाणी प्यायला द्या. त्यामुळे मुलांचे वजनही वेगाने वाढेल.
तुप किंवा लोणी
लहान मुलांच्या आहारात तुपाचा किंवा लोण्याचा समावेश करावा. यामध्ये असलेले फॅट्स लहान मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. जेवणात किंवा चपातीला लावून तुम्ही त्यांना तुप किंवा लोणी देऊ शकता.
मलई असलेले दुध
लहान मुलांच्या आहारात मलई असलेल्या दुधाचा आवर्जुन समावेश करावा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जर दुध प्यायला लहान मुलं टाळाटाळ करत असतील तर त्यामध्ये चॉकलेट किंवा मुलांच्या आवडीचे शेक घालुन तुम्ही देऊ शकता.
केळ्याचा शेक
केळी अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतात. तुमच्या मुलाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बनना शेक त्यांना द्यावा.
हिरव्या भाज्या
मुलांनी कितीही नाकं मुरडली तरी हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात असलाच पाहिजे. हिरव्या भाज्या अनेक पोषकतत्वांनी तर युक्त असतातच पण त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे लहान मुलांचे पाचनतंत्र सुधारते. ब्रोकोर्ली, मटार, पालक, फ्लॉवर इत्यादी भाज्यांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.