तुमचे डोळे दाखवतात वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलची लक्षणं, उशीर होण्याआधीच जाणून घ्या उपाय तज्ज्ञांकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:30 PM2022-02-13T15:30:24+5:302022-02-13T15:31:10+5:30

तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या डोळ्यातील काही समस्या उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणं दर्शवतात.

your eyes show signs of increased cholesterol know the symptoms from experts | तुमचे डोळे दाखवतात वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलची लक्षणं, उशीर होण्याआधीच जाणून घ्या उपाय तज्ज्ञांकडून

तुमचे डोळे दाखवतात वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलची लक्षणं, उशीर होण्याआधीच जाणून घ्या उपाय तज्ज्ञांकडून

googlenewsNext

शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त (High Cholesterol) असल्यानं अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. उच्च कोलेस्ट्रॉलला हायपरकोलेस्टेरोलेमिया (Hypercholesterolaemia) देखील म्हणतात. आजकाल बहुतेक लोक उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा हायपरकोलेस्टेरोलेमियाची त्रास उद्भवतो. यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

मुख्यतः चरबीयुक्त अन्न खाणं, व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, मद्यपान, धूम्रपानाची सवय यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या सुरू होते. जरी उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत (High cholesterol symptoms) नाहीत, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो. जेव्हा उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार करतो तेव्हा हा परिस्थिती उद्भवते. प्लाक (Plaque) तयार झाल्यामुळे धमन्या (Arteries) अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा (Symptoms of High Cholesterol in Eyes) येतो.

उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे डोळ्यांमध्ये दिसतात
तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या डोळ्यातील काही समस्या उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणं दर्शवतात. डॉ. उमा मल्ल्या (वरिष्ठ सल्लागार, नेत्ररोग, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली) म्हणतात की, डोळ्यांतील काही समस्या तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे सूचित करतात. डोळ्यांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची मुख्यतः तीन लक्षणे आहेत, आर्कस सेनिलिस/एर्कस जुवेनिलिस (Arcus senilis/arcus juvenilis), जैंथेलस्मा (Xanthelesma) आणि सेंट्रल रेटिनल आर्टरी/ब्रांच रेटिनल आर्टरी ऑकल्यूजन (Central retinal artery/branch retinal artery occlusion).

आर्कस सेनिलिस/आर्कस जुवेनिलिस म्हणजे काय?
डॉ. मल्ल्या म्हणतात की आर्कस सेनिलिसला कॉर्नियल आर्कस देखील म्हणतात. आर्कस सेनिलिसमध्ये, कॉर्नियाच्या बाहेरील काठावर राखाडी, पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वर्तुळ तयार होते. हे कॉर्नियाभोवती चरबी आणि कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होते. प्रौढांमध्ये, आर्कस सेनिलिस सामान्य आहे, जे वृद्धत्वामुळे उद्भवते. जर ही वर्तुळं तरुण आणि मुलांमध्ये दिसल्या तर त्याला आर्कस जुवेनिलिस म्हणतात. त्यावर उपचार करणे आवश्यक आहे, परंतु त्याचा व्यक्तीच्या पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही.

झेंथेलास्मा म्हणजे डोळ्यांच्या त्वचेखाली, पापण्यांच्या आजूबाजूला किंवा पापण्यांवर कोलेस्टेरॉलचा पिवळसर रंग जमा होणं. हा त्वचेसाठी हानिकारक नाही किंवा त्यामुळे वेदना किंवा जळजळ होत नाही. ही समस्या सहजपणे बरी करता येते. हे शरीरात उच्च कोलेस्टेरॉलचं लक्षण आहे आणि कोलेस्टेरॉल कमी असतानाही ते राहतात. ते केवळ शस्त्रक्रियेद्वारे काढलं जाऊ शकते.

सेंट्रल रेटिना आर्टरी/ब्रांच रेटिनल आर्टरी ऑक्लुजन म्हणजे काय?
सेंट्रल रेटिना आर्टरी/ब्रांच रेटिनल आर्टरी आक्लुजन म्हणजे त्यात अडथळे उद्भवणं. यामुळं डोळ्यातील पडद्याची मध्यवर्ती धमनी अवरोधित होते. हा अडथळा एम्बोलसमुळं (Embolus) होतो. यामुळं अचानक, वेदनारहित आणि सामान्यतः गंभीरीत्या दृष्टी कमी होऊ शकते. या समस्येकडं दुर्लक्ष करणं गंभीर असू शकते. धमन्यांच्या एका शाखेत अडथळे निर्माण झाल्यामुळं डोळयातील पडद्यापर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो.

उच्च कोलेस्टेरॉलचा उपचार काय आहे?
जर तुमचं कोलेस्टेरॉल जास्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकते. डोळ्यांशी संबंधित वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना नक्की दाखवा. रक्तातील एचडीएल, एलडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण रक्त तपासणीद्वारे कळतं. जर कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर, ती औषधांद्वारे कमी करता येते. यासोबतच मेटॅबॉलिक सिंड्रोम, रक्तातील साखरेची पातळीही तपासली जाते.

उच्च कोलेस्टेरॉल टाळण्याचे मार्ग
उच्च कोलेस्ट्रॉलमुळं हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. उच्च कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी, निरोगी आहार घ्या. अन्नामध्ये जास्त तेल, मसाल्यांचा समावेश करू नका. रोज व्यायाम करा. स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवा. लठ्ठपणा वाढू देऊ नका. दारू पिणं, धूम्रपान करू नका. आहारात हिरव्या भाज्या, फळं, धान्यं अशा आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा.

Web Title: your eyes show signs of increased cholesterol know the symptoms from experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.