तुमचा चेहरा देत असतो अनेक गंभीर आजारांचे संकेत, कशी जाणून घ्याल काय समस्या आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:19 AM2024-04-02T09:19:22+5:302024-04-02T09:19:54+5:30

Skin Signs: जर त्वचेवर दिसणाऱ्या या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं तर जास्त नुकसान टाळता येऊ शकतं. चला जाणून घेऊ असेच चेहऱ्यावर दिसणारे काही संकेत...

Your face is giving signs of many serious diseases, how do you know what is the problem? | तुमचा चेहरा देत असतो अनेक गंभीर आजारांचे संकेत, कशी जाणून घ्याल काय समस्या आहे?

तुमचा चेहरा देत असतो अनेक गंभीर आजारांचे संकेत, कशी जाणून घ्याल काय समस्या आहे?

Skin Signs: हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, शरीरात जर काही समस्या असेल तर त्याचे काही संकेत शरीर वेळोवेळी देत असतं. सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचं आरोग्य चांगलं रहावं. अशात लोक काही संकेत दिसले की, लगेच उपचार घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुमची त्वचाही तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगते. जर त्वचेवर दिसणाऱ्या या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं तर जास्त नुकसान टाळता येऊ शकतं. चला जाणून घेऊ असेच चेहऱ्यावर दिसणारे काही संकेत...

पिंपल्स कशाचे संकेत?

चेहऱ्यावर पिंपल्स येणं फारच कॉमन आहे. पण जर गालावर पिंपल्स सतत होत आहेत आणि दूर होण्याचं नाव घेत नसतील तर याचा अर्थ तुमचं पोट साफ होत नाहीये. ही एक डायजेशनची समस्या आहे. जर गालांखाली पिंपल्स होत असतील तर याचा अर्थ लंग्समध्ये काहीतरी बिघाड आहे. अशात लगेच डॉक्टरांना भेटा.

डार्क सर्कलचं कारण

जास्त वेळ स्‍क्रीनच्या संपर्कात राहिल्याने किंवा चांगली झोप न झाल्याने सामान्यपणे डार्क सर्कल होतात. पण वरील कारणांशिवाय डोळ्यांखाली काळे डाग असतील तर याचा अर्थ तुमची किडनी योग्यपणे काम करत नाहीये. यासाठी लगेच टेस्ट करा.

व्हाइट हेड कशाचे संकेत?

हनुवटीवर पिंपल्स होणं म्हणजे हार्मोन अनियंत्रित झाले आहेत. जर हनुवटीच्या भागात व्हाइड हेड किंवा पुरळची समस्या असेल तर याचा अर्थ गायनोलॉजिकल हेल्‍थसंबंधी समस्या झाली हे. अशात पीसीओडी किंवा पीसीओएस समस्या असू शकते.

आयब्रोवर सूज

आयब्रोच्या आजूबाजूला सूज असेल किंवा खाज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. आइयब्रोवर सूज येण्याची समस्या लिव्हरसंबंधी असू शकते.

कपाळावर पिंपल्स

कपाळावर पिंपल्स येण्याचं कारण म्हणजे छोट्या आतड्यांमध्ये इन्फेक्शनची समस्या किंवा त्यात काही समस्या. त्याशिवाय पोटासंबंधी समस्याही असू शकते. हे टाळण्यासाठी हायड्रेट रहावं.

ओठावर पिंपल्स म्हणजे?

ओठ आपल्या त्वचेचा फारच संवेदनशील एरिया असतो. यावर पिंपल्स येणं फार जास्त रेअर असतं. पण जर असं होत असेल तर याचा अर्थ होतो की, तुमचं हृदय योग्यपणे काम करत नाहीये.  

Web Title: Your face is giving signs of many serious diseases, how do you know what is the problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.