आपल्या उंचीवरून ठरते आपले आरोग्य...घ्या जाणून संशोधकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:43 PM2021-07-09T16:43:53+5:302021-07-09T16:44:29+5:30
कुणावर इम्प्रेशन मारायचे असेल तर उंचीचा फार फायदा होतो. अनेकजण उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरंतर आपली उंची किशोरवयातच वाढते. पण तुम्हाला माहित आहे का उंचीचा तुमच्या शारीरीक स्वास्थ्याशीही थेट संबंध आहे. कसा ते घ्या जाणून...
आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या उंचीशी थेट संबध असतो. चांगली उंची असणाऱ्या व्यक्ती रुबाबदार दिसतात. कुणावर इम्प्रेशन मारायचे असेल तर उंचीचा फार फायदा होतो. अनेकजण उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरंतर आपली उंची किशोरवयातच वाढते. पण तुम्हाला माहित आहे का उंचीचा तुमच्या शारीरीक स्वास्थ्याशीही थेट संबंध आहे. कसा ते घ्या जाणून...
कॅन्सरचा धोका
कमी उंची असणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका कमी असतो तर उलट जास्त उंची असणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असतो.
डायबिटीसचा धोका
जर्मन सेंटर ऑफ डायबिटीस रिसर्चच्यानुसार उंच लोकांमध्ये डायबिटीसचा धोका अधिक असतो. तसेच याच संशोधनानुसार छोट्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त असतो.
गर्भधारणा
संशोधनानुसार उंची जास्त असलेल्या महिला बाळाला योग्य महिन्यांनंतर जन्म देतात तर कमी उंची असलेल्या महिलांमध्ये प्री प्रेग्नन्सिचा धोका अधिक असतो.
केस गळणे
संशोधनानुसार छोट्या उंचीच्या लोकांचे केस लांब उंचीच्या लोकांच्या तुलनेत जास्त वेगाने गळतात. तसेच अनेक अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की, कमी उंचीची लोक जास्त जगतात. मोठ्या उंचीच्या लोकांच्या तुलनेत त्यांच्यात गंभीर आजारांचा धोका कमी असतो. छोटी उंची असणाऱ्यांच्या शरीरात जास्त काळ जगण्यासाठी आवश्यक असेलेले जिन्स असतात. त्यामुळे त्यांची हाईट जरी कमी असली तरी ती लोक जास्त काळ जगतात.
आयक्यु
काही रिर्सचनुसार काही जिन्समुळे छोट्या उंचीच्या लोकांमध्ये मोठ्या लोकांच्या उंचीच्या तुलनेत कमी बुद्धीमत्ता असते.
डिप्रेशन
कमी उंचीच्या व्यक्तींच्या तुलनेत उंच व्यक्तींना डिप्रेशनचा धोका अधिक असतो. छोट्या उंचीच्या लोकांमध्ये डिप्रेशन दुर करणारे जिन्स अधिक असतात.