तुमची पाण्याची बॉटल तर तुम्हाला आजारी करत नाहीये ना? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:54 PM2022-10-07T15:54:18+5:302022-10-07T15:54:23+5:30

Health Tips : पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. 

Your water bottle making you sick, know the reason | तुमची पाण्याची बॉटल तर तुम्हाला आजारी करत नाहीये ना? जाणून घ्या कारण...

तुमची पाण्याची बॉटल तर तुम्हाला आजारी करत नाहीये ना? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

ऑफिस बॅग असो वा डेस्क पाण्याची बॉटल तुम्ही ठेवतच असाल. पण ही तहान भागवण्याच्या कामात येणारी ही बॉटल तुम्हाला आजारी करु शकते. हे तुम्हालाही माहीत असेल की, जास्तीत जास्त पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. 

आजकाल प्रत्येक घरात प्लॅस्टीकचे रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाइनची भांडी बघायला मिळतात. यातून खाणे किंवा त्यात पदार्थ ठेवणे लोक फॅशन समजतात. पण हेच तुमची शान वाढवणारी भांडी तुम्हाला गंभीर आजाराच्या उंबरठ्यावर नेऊ शकते.  जर तुम्हीही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित असाल आणि प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये जेवण करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नेहमी मॉइश्चर असतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया राहतो. आणि यामुळे तुम्हाला डायरिया होण्याची शक्यता अधिक असते. पाण्याच्या बॉटल या बराचवेळ बंद असतात त्यामुळे दमटपणा निर्माण होतो आणि याच कारणामुळे त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात. 

असे करा स्वच्छ

तुम्ही बॉटल आतपर्यंत स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करू शकता. जर तुम्ही बॉटल नेहमी स्वच्छ केली नाही तर त्यात व्हिटॅमिन इ बॅक्टेरिया वाढतो. यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग आणि गॅस्ट्रोची समस्याही होऊ शकते. 

गरम पाण्याने करा स्वच्छ 

बॉटल नेहमी गरम पाण्याने स्वच्छ करायला हवी. बॉटलमध्ये गरम पाणी टाकून ब्रशच्या माध्यमातून बॉटल स्वच्छ करावी.

विनेगरनेही करा बॉटल स्वच्छ

बॉटलमध्ये विनेगर टाकूनही तुम्ही बॉटल स्वच्छ करु शकता. याने बॉटलमधील बॅक्टेरिया मरतात आणि तुम्हाला आजार होण्याची शक्यताही कमी होते.

Web Title: Your water bottle making you sick, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.