तुमचं वजन वाढतच चाललंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:44 PM2018-02-05T17:44:39+5:302018-02-05T17:45:31+5:30

तुमच्या ‘झोपेत’ त्याचं उत्तर दडलेलं असू शकेल!

 Is your weight increasing day by day? | तुमचं वजन वाढतच चाललंय?

तुमचं वजन वाढतच चाललंय?

Next
ठळक मुद्देकमी झोपेमुळे वजन वाढतं, याचं कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल.लेप्टिन हार्मोन्स आपल्या शरीराच्या फॅट सेल्सपासून तयार होतात. कुठल्याही खाण्यानंतर आपली तृप्ती झाली की हे हार्मोन्स मेंदूला सांगतात, आता थांब.घ्रेलिन हार्मोन्स आपल्या पोटापासून निर्माण होतात आणि ते मात्र आपल्या शरीराला सांगत असतात, आपलं खाणं सुरू ठेव!

- मयूर पठाडे

तास-दोन तास कमी झोपलं तर त्यानं एवढं काय बिघडतं, असं आपल्याला वाटतं, त्याकडे आपण दुर्लक्षही करतो. अनेक जण तर अभिमानानं सांगतात, मी रात्री बारा-एकशिवाय कधीच झोपत नाही. सकाळीही लवकर उठतो. पुढे जायचं असेल, काही करून दाखवायचं असेल, तर झोपेत आयुष्य घालवून काय उपयोग?..
पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, झोपेचा आणि तुमच्या आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. पुरेशी झोप तुम्ही घेतली नाहीत, तर अंतिमत: तुमचं आयुष्यच कमी होईल. झोपेचा आणि लठ्ठपणाचा, वजनवाढीचाही खूप जवळचा संबंध आहे.
कमी झोपेमुळे वजन वाढतं, याचं कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल. आपली भूक ही मुख्यत: दोन प्रकारच्या हार्मोन्सवर अवलंबून असते, लेप्टिन आणि घ्रेलिन.
लेप्टिन हार्मोन्स हे मुख्यत: आपल्या शरीराच्या फॅट सेल्सपासून तयार होतात. जेवणानंतर किंवा कुठल्याही खाण्यानंतर आपली तृप्ती झाली की हे हार्मोन्स मेंदूला सांगतात, आता थांब.
घ्रेलिन हार्मोन्स आपल्या पोटापासून निर्माण होतात आणि ते मात्र आपल्या शरीराला सांगत असतात, आपलं खाणं सुरू ठेव!
ज्या व्यक्ती कमी किंवा अगदी पाच तासांपेक्षाही कमी झोपतात, त्यांच्या शरीरातील लेप्टिन हार्मोन्सचं प्रमाण जवळपास १५टक्क्यांनी कमी होतं, तर घ्रेलिन हार्मोन्सचं प्रमाण १५ टक्क्यांनी वाढतं. त्यामुळे साहजिकच जे लोक कमी खातात, त्यांच्यात खाणं सुरू ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. त्यांची ‘तृप्ती’ होत नाही आणि समाधानही होत नाही.. त्यामुळे अर्थातच या खाण्यामुळे ज्या अतिरिक्त कॅलरीज आपल्या शरीरात जमा होतात, त्याचं चरबीत रुपांतर होतं आणि आपलं वजन कलेलकलेनं, अन् त्याचबरोबर हळूहळू किलो किलोनं वाढत जातं. या गरगरीत बॉडीचे काय दुष्परिणाम होतात, असतात, ते खरं तर प्रत्यक्ष आपण त्या फेजमधून जात नाही, त्याशिवाय कळत नाही. पण जेव्हा कळतं तेवह फार उशीर झालेला असतो आणि त्यासाठीचे कष्टही मग खूप घ्यावे लागतात.

Web Title:  Is your weight increasing day by day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.