चिंताजनक! कोरोनानंतर तरुणांमध्ये वाढला हार्ट अटॅकचा धोका; बीपी, शुगर नाही तरी पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 05:30 PM2023-08-25T17:30:50+5:302023-08-25T17:50:42+5:30

बीपी आणि शुगर नसतानाही तरुणांना हार्ट अटॅक येत आहे, ही चिंतेची बाब आहे.

youth heart attack patient in jharkhand is increased know how to protect | चिंताजनक! कोरोनानंतर तरुणांमध्ये वाढला हार्ट अटॅकचा धोका; बीपी, शुगर नाही तरी पण...

चिंताजनक! कोरोनानंतर तरुणांमध्ये वाढला हार्ट अटॅकचा धोका; बीपी, शुगर नाही तरी पण...

googlenewsNext

कोरोनानंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. बीपी आणि शुगर नसतानाही तरुणांना हार्ट अटॅक येत आहे, ही चिंतेची बाब आहे. थ्रोम्बोटिक ऑक्लूजनसह हार्ट अटॅक आल्याचं पाहायला मिळत आहे. रिम्ससह खासगी रुग्णालयांमध्ये अशी प्रकरणे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी रांचीतील 28 आणि 34 वर्षांच्या दोघांना हार्ट अटॅकचा  झटका आला होता. दोघेही बीपी आणि शुगरचे रुग्ण नव्हते. मात्र, त्यांना कोरोना झाला होता.

एका 40 वर्षीय महिलेला थ्रोम्बोटिक ऑक्लुशनमुळे हार्ट अटॅक आला. या महिलेलाही बीपी आणि शुगर नाही. RIMS चे डॉ. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धांमध्ये हार्ट अटॅक आला तर धमन्या प्रभावित होतात, परंतु तरुणांमध्ये धमनीच ब्लॉकेज होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर ही समस्या केवळ झारखंडमध्येच नाही तर संपूर्ण देशात वाढली आहे. हृदयविकाराच्या झटक्याबरोबरच ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

हार्ट अटॅकनंतर एका तरुणाची अँजिओप्लास्टी करण्यात आली मात्र काही दिवसांनी त्याला ब्रेन स्ट्रोक आला. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांदरम्यान WHO ने जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. दररोज भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे उपलब्ध होतील. त्याचबरोबर फास्ट फूड, शीतपेये आणि अल्कोहोलचे सेवन न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोरोनानंतर हात आणि पायांच्या नसांमध्ये ब्लॉकेजची समस्याही वाढली आहे. हात-पायांची तपासणी करून ही माहिती मिळत आहे. हे पोस्ट कोविडच्या समस्येशी देखील जोडले जात आहे. थ्रोम्बोटिक ऑक्लुशनमुळे तरुणांमध्ये अधिक हार्ट अटॅक येतो. रुग्णालयात तीन दिवसांत 28 ते 35 वयोगटातील तीन ते चार तरुणांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. कोरोनानंतर अशी आणखी प्रकरणे समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी आठवड्यातून काही मिनिटं चाला आणि नियमित योगाभ्यास करा असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
 

Web Title: youth heart attack patient in jharkhand is increased know how to protect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.