विचित्र अपघातात १ ठार

By admin | Published: February 13, 2015 03:17 PM2015-02-13T15:17:27+5:302015-02-13T15:17:27+5:30

औंढा /नागनाथ ते जवळाबाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एक पिकअप, २ ट्रक व एक पियाजो ऑटो यांच्यात अपघात झाला.

1 dead in a strange accident | विचित्र अपघातात १ ठार

विचित्र अपघातात १ ठार

Next

 

जवळा बाजार : /औंढा /नागनाथ ते जवळाबाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एक पिकअप, २ ट्रक व एक पियाजो ऑटो यांच्यात अपघात झाला. यात ऑटोमधील एकजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 
औंढा नागनाथ ते जवळा बाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात जिंतूर फाट्याजवळ सकाळी ९ वाजता नांदेडकडून ट्रक क्र. एपी- १६ टीडब्ल्यू ८१७९ हा मिरची घेवून जात होता. तर त्यांच्या पाठीमागून एमएच २६- ७७२४ ट्रक जात होता. याचवेळी औंढय़ाकडून शिरडशहापूरकडे पियाजो ऑटो एमएच २२ एन- ३१८३ हा प्रवासी घेवून जात असताना पाठीमागून पिकअप क्र. एमएच २६, एडी ८७६७ हा भरधाव वेगाने आला. या पिकअपने प्रथम एपी-१६ टीडब्ल्यू १८७९ ला समोरून धडक देवून दुसर्‍या ट्रकवर तो आदळला. त्यानंतर पुढे असलेल्या ऑटोवर जावून पडला. यात ऑटोमधील नामदेव लोडबा मोरे (४८ रा.जिजामाता नगर हिंगोली) या छायाचित्रकाराचा जागीच मृत्यू झाला. नामदेव महादू खोकले (२५ रा. जलालधाबा), शेख उस्मान शेख गुलाब (२८ रा. पेडगाव ता. हिंगोली), शेषेकलाबाई महादू खोकले (४0 रा. जलालधाबा), शबाना शेख उस्मान (४0, पेडगाव), शोभा शिवाजी धनवे (२२, रा.वाळकी), स्वप्नील मंचक बेले (१६ रा.रामवाडी ता.कळमनुरी) हे गंभीर जखमी झाले.औंढा येथे ग्रामीण रुग्णालयात डॉ.सतीश वाकळे, डॉ.ढेंबरे, जयo्री फत्तेपुरे, पुष्पा कांबळे, भुजंग हनवते यांनी त्यांच्यावर प्रथमोचार केले. याबाबतची फिर्याद मुंजाजी अंभोरे (रा.वगरवाडी) यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच औंढा ठाण्याचे पोनि लक्ष्मण केंद्रे, पोना भिमराव चिंतारे तसेच जवळाबाजार पोलिस चौकीचे जमादार शे. खुद्दूस, इम्रान सिद्दीकी, प्रभाकर भोंग, बेटकर यांनी घटनास्थळी जावून जखमींना दवाखान्यात नेले. घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. /(वार्ताहर)

 

Web Title: 1 dead in a strange accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.