हिंगोलीत कारच्या काचा फोडून भर रस्त्यातून पळविली १ लाखाची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:35 PM2018-04-03T19:35:53+5:302018-04-03T19:35:53+5:30

तालुक्यातील बळसोंड ग्रा. पं. हद्दीत येत असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद समोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून १ लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. 

1 lacs of cash stolen from the car in Hingoli | हिंगोलीत कारच्या काचा फोडून भर रस्त्यातून पळविली १ लाखाची रोकड

हिंगोलीत कारच्या काचा फोडून भर रस्त्यातून पळविली १ लाखाची रोकड

Next

हिंगोली : तालुक्यातील बळसोंड ग्रा. पं. हद्दीत येत असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद समोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून १ लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. 

हनवता बाजीराव ढाले रा. बासंबा यांनी अकोला बायपास भागातील रामाकृष्णा नगर येथे घर बांधले आहे. त्यासाठी त्यांनी बासंबा शाखेच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेतून गृहकर्ज घेतले आहे. त्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेतून चेकद्वारे १ लाखाची रक्कम काढली व ते अकोला बायपास भागातील स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेत गृहकर्जाचे एक लाख रुपये भरण्यासाठी  एम.एच.३८- २११४ या क्रमांकाच्या कारने बँकेत आले होते. त्यांनी कारच्या समोरील डिक्कीमध्ये ५० हजार तर चालकाच्या बाजुच्या सिटखाली दस्तीमध्ये गुंडाळून ५० हजार असे एक लाख रुपये ठेवून ते बँकेमध्ये स्पिल भरण्यासाठी कार  लॉक करून गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी कारचे दरवाजे उघडण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु दरवाजे उघडत नसल्याने चक्क कारच्या डाव्या बाजूचे दरवाच्याचे काच फोडून हात घालून दरवाजा उघडला व कारमधील दोन्ही ठिकाणची १ लाख रुपयाची रक्कम घेऊन पसार झाले. 

कारच्या काचा फुटल्याचे बँकेसमोरील ग्राहकांच्या लक्षात येताच ग्राहकाने कारकडे आरडाओरडा करत धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दिवसा ढवळ्या पळविलेल्या रक्कमेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी हनवता बाजीराव ढाले यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चोरी सीसीटीव्हीत कैद

बँक समोर उभे असलेल्या कार मधील रोकड पळविल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. तो पोलिसांना देण्यात येणार असल्याचे शाखा प्रबंधक महेंद्र प्रसाद यांनी सांगितले. कार मधील १ लाख रुपय पळविणाऱ्याचा तपास करण्यासाठी पथके तयार केले असून, सीसीटीव्हीतील फुटेज मुळे चोरट्यांना वेळीच जेरबंद करण्यास सहकार्य होईल अशी माहिती पोनि जगदीश भंडारवार यांनी दिली. 

Web Title: 1 lacs of cash stolen from the car in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.