१0 गावांचा निवडणूक बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:06 AM2019-04-06T00:06:15+5:302019-04-06T00:06:38+5:30
तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेले संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, सावरखेडा, लोहरा बु., दरेवाडी, रेवणसिद्ध तांडा, पवार तांडा, तामटी तांडा या दहा गावांना कोणत्याच सोयीसुविधा शासन देत नाही. या दहा गावांत सध्या भिषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळी यादीत समाविष्ट करावे, पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे यासह डोंगरी गावांच्या यादीत शासनाने ही गावे घ्यावीत ही प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असून या गावातील एकही मतदार मतदान करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवकाशीबाई माळवटकर, बाळू जावळे, सुनीता राठोड, भगवान काशिदे, सुनीता जावळे, रेखा पवार, मनुकाबाई राठोड, उल्हास पवार, लक्ष्मीबाई पवार, सटवा डुकरे, रावसाहेब धवसे, सुवर्णमाला जावळे, श्रीराम राठोड, गणेश राठोड, सरस्वती राठोड, बाबाराव जावळे, धर्मपाल राठोड, प्रदीप चव्हाण, गजानन राठोड, राजेश पवार, उषा पवार, सचिन जावळे, नरहरी जावळे, मंगेश महाजन, सुधाकर चव्हाण, साहेबराव काशिदे, जगन्नाथ जावळे, मनोहर महाजन, बालाजी भागवत, विजय जावळे, मधुकर महाजन, शिवराज शेटे, पुरभाजी माळवटकर, गोमजी काशिदे, सुदर्शन जावळे, शिवशंकर जावळे, लक्ष्मण बगाटे, प्रसेनजित धवसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.