१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:44 PM2018-03-16T23:44:23+5:302018-03-17T11:03:09+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

 108 Ambulances have been promoted to 3520 patients | १०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

googlenewsNext

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

मागील दोन वर्षांपासून रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल रस्त्यावरील अपघातात २६० जणांचा बळी गेलेला असला तरीही जखमींची संख्या सर्वाधिक जास्त आहे. केवळ वेळेवर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. तर अनेक गोरगरीब रुग्णांना हिंगोली येथून नांदेडसह इतर रुग्णालयात रुग्णांना हलविण्यासाठीही ही रुग्णवाहिका अतिशय उपयेगाची ठरली आहे. विशेष करुन १०२ जननी शिशुच्या रुग्णवाहिकेला उतरती कळा आल्याने याच रुग्णवाहिकेवर गरोदरमांताची ने-आण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेही रुग्ण समाधानी आहेत.

मात्र एखाद्यावेळी गरोदर मातेला आणण्यासाठी तर कधी प्रसुती मातांना नेऊन सोडण्यासाठी रुग्णवाहिका गेल्यास, अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १०२ रुग्णवाहिकेचा ताण कमी करुन केवळ अपघातस्थळी जाण्यासाठीच या रुग्णवाहिकेचा वापर केल्यास खरोखरच अनेक रुग्णांना ही रुग्णवाहिका संजीवनी ठरणार आहे. सध्या दोन्हीकडेही रुग्णवाहिका धावत असल्याचे चित्र आहे. तर हिंगोलीतील यंत्राणाही रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत यंत्रणेला कडक सूचविले आहे. तर अनेकदा याबाबत तक्रार आल्यास स्वत: दखल घेवून संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे कामाचा ताण
जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १२ रूग्णवाहिका आहेत. प्रत्येक रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे तीन डॉक्टर असणे आवश्यक आहेत. परंतु १२ रूग्णवाहिकेवर केवळ २८ डॉक्टरच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रूग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेत कॉल पूर्ण करता यावा यासाठी डॉक्टरांकडून नियोजन केले जाते. परंतु त्यामुळे मात्र अतिरिक्त कामाचा ताण येतो. लवकरच तीन डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायतुल्ला खान यांनी सांगितले. तर १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वाहने दुरूस्तीस पाठविली आहेत. तर ६ रूग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत.

Web Title:  108 Ambulances have been promoted to 3520 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.