हिंगोली जिल्ह्यातील १०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:48 AM2019-02-13T00:48:42+5:302019-02-13T00:49:10+5:30

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

 108 students eligible for scholarship from Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातील १०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

हिंगोली जिल्ह्यातील १०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रशासनामार्फत राष्टÑीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा सुरू केली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शिकाऊ बुद्धीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, व त्याला विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाकडून दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उतीर्ण करून निवड झालेल विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. अखिल भारतीय पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीची संख्या १ लाख आहे. राज्यासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. या कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा व संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७६५ जणांनी परीक्षा दिली तर ८ विद्यार्थी अनुपस्थित होते. यात ३०० विद्यार्थी उतीर्ण झाले होते. त्यापैकी एकूण १०९ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांना यापुर्वी ६ हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात असे, आता रक्कमेत वाढ करण्यात आली असून सदर पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी आॅनलाईन नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. नुतनीकरणाशिवाय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत वार्षिक रु. १२०० हजार रूपये दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभासाठी ९ वी व ११ वीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. तर एसटी, एससी, व्हिजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुणांची आवश्यकता असते.
आवश्यक कागदपत्रे...
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आई व वडिलाचे दोघांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारापेक्षा कमी असावे. तर नोकरीत असलेल्यांनी आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार व तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. सातवीमध्ये सर्वसाधारण संवगार्साठी किमान ५५ टक्के तर आरक्षित संवगार्साठी किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, वर्ग ७ ची गुणपत्रिका व फोटो असे आहेत.

Web Title:  108 students eligible for scholarship from Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.