१०८८ शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:39 AM2018-04-15T00:39:20+5:302018-04-15T00:39:20+5:30

येथील कृउबा समितीने नाफेड मार्फत ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ९५२ शेतकऱ्यांची ९९७८ क्ंिवटल तुरीची खरेदी केली आहे. अजूनही तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १०८८ शेतकºयांची तूर घेणे बाकीच आहेत.

 1088 farmers waiting for purchase of tur | १०८८ शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

१०८८ शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील कृउबा समितीने नाफेड मार्फत ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ९५२ शेतकऱ्यांची ९९७८ क्ंिवटल तुरीची खरेदी केली आहे. अजूनही तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १०८८ शेतकºयांची तूर घेणे बाकीच आहेत.
१०८८ शेतकरी अजूनही तूर खरेदी कधी होईल, याच प्रतीक्षेत आहेत. ७ फेब्रुवारीपासून नाफेडमार्फत तुरीची खरेदी केल्या जात आहे. अजूनही बाजार समितीत तूर विकण्यासाठी शेतकºयांच्या रांगा आहेत. तूर घेण्यासाठी एकच काटा आहे. त्यामुळे दररोज २५० ते ३०० क्विंटलच तुरीची खरेदी केल्या जात आहे. ९५२ शेतकºयापैकी फक्त ५६५ शेतकºयांनाच तुरीच्या विक्रीची रक्कम मिळाली आहे. ३ कोटींच्या जवळपास रक्कम अजूनही थकली आहे. शेतकरी या रक्कमेसाठी बाजार समितीच्या चकरा मारत आहेत. हेक्टरी १० क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी होते. नाफेडमार्फत तुरीला ५४५० रुपये क्विंटल हमीभाव दिला जात आहे. सध्या शेतकरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी रांगा लावलेल्या आहेत. हरभरा विक्रीसाठी १७०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
हरभºयाची खरेदी बाजार समितीत अजूनही सुरू झालेली नाही. हरभºयाला ४४०० रुपये क्विंटल भाव दिला जाणार आहे. १०८८ शेतकºयांची तुरीची खरेदी अजून शिल्लक आहे. या खरेदीसाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. आॅनलाईन नोंदणी करूनही लवकर शेतीमालाची विक्री होत नाही. विक्री करूनही रक्कम मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

Web Title:  1088 farmers waiting for purchase of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.