१०,९४३ मतदार अखेर वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:30 AM2021-07-28T04:30:50+5:302021-07-28T04:30:50+5:30
जिल्ह्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची वगळणी करण्यात आली. छायाचित्र नसल्याने तोच मतदार मतदान करीत आहे किंवा नाही, हे ...
जिल्ह्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची वगळणी करण्यात आली. छायाचित्र नसल्याने तोच मतदार मतदान करीत आहे किंवा नाही, हे कळायला मार्ग नसते. परिणामी, बोगस मतदानाची भीती असते. याबाबत बुथवरही अनेकदा वाद झडतात. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या मतदारांना तहसीलसह बीएलओंकडे छायाचित्र सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. या वेळेत छायाचित्र सादर न केल्याने ११ हजार मतदारांना वगळण्यात आले आहे. काहींनी तर छायाचित्र दिल्यानंतरही नाव वगळल्याची ओरड सुरू केली आहे. अशांना पुन्हा फॉर्म क्र. ६ भरून देऊन नाव पूर्ववत करून घेण्याची संधी आहे. तो भरण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
हिंगोलीचे ७,२४४ वगळले
हिंगोली मतदारसंघात ३ लाख १२ हजार ७१६ मतदार असून, ८,०१५ जणांचे छायाचित्र नव्हते. यापैकी ५८९ सादर झाले, तर ७,१४४ वगळले. कळमनुरीत ३ लाख १० हजार ५६७ मतदार असून, ३,९३६ जणांचे छायाचित्र नव्हते. ३८० जणांनी सादर केले. ३,४१३ जण वगळले. वसमतला २ लाख ९७ हजार मतदार असून, ४०७ जणांचे छायाचित्र नव्हते. १२१ जणांनी सादर केले, तर २८६ जण वगळले.