हिंगोली जिल्ह्यातून ११ जणांना केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:53+5:302021-01-01T04:20:53+5:30
वसमत शहर पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावातील टोळी प्रमुख भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण, हिरासिंग भुऱ्यासिंग चव्हाण, दीपाकौर भुऱ्यासिंग चव्हाण, कमलकौर ...
वसमत शहर पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावातील टोळी प्रमुख भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण, हिरासिंग भुऱ्यासिंग चव्हाण, दीपाकौर भुऱ्यासिंग चव्हाण, कमलकौर भुऱ्यासिंग चव्हाण, बाळू ऊर्फ अभिजीत ऊर्फ अविनाश कैलास खंदारे (रा. शिक्कलकरी वस्ती रेल्वे स्टेशन रोड, वसमत) तर सहायक पोलीस निरीक्षक हट्टा यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील टोळीप्रमुख साहेबसिंग ऊर्फ बंगालसिंग रतनसिंग चव्हाण ( रा. रेल्वे स्टेशन वसमत) व टोळीतील सदस्य महेंद्र भगवान करवंदे, सुनील गंगाधर करवंदे, धम्मपाल संभाजी करवंदे ( सर्व रा. मुडी, ता. वसमत) पंडित बापूराव गायकवाड , रमेश सुरेशराव गायकवाड (रा. गणेशपूर, ता. वसमत) यांना हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर काढून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ (१) प्रमाणे जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोउपनि शिवसांब घेवारे, पोहेकॉ विलास सोनवणे यांनी कामकाज केले आहे. हिंगोली जिल्ह्यात अशा टोळीने गुन्हे करणाऱ्या जास्तीत जास्त गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक कलासागर यांनी सांगितले.