जिल्ह्यात कोविडचे नवीन ११ रुग्ण ; तर २ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:20+5:302021-01-04T04:25:20+5:30

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ३ यामध्ये चिंचाेली येथील १, आनंदनगर, भानखेडा, अंधारवाडी, सावा तर सेनगाव २ ...

11 new patients of Kovid in the district; So 2 is better | जिल्ह्यात कोविडचे नवीन ११ रुग्ण ; तर २ बरे

जिल्ह्यात कोविडचे नवीन ११ रुग्ण ; तर २ बरे

Next

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ३ यामध्ये चिंचाेली येथील १, आनंदनगर, भानखेडा, अंधारवाडी, सावा तर सेनगाव २ यामध्ये सेनगाव व आजेगाव येथील १, औंढा नागनाथ ३ यामध्ये शिंदेवाडी, दुघाळा तांडा येथील दाेघांसह ११ जण आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे वसमत येथे १० जणांची तसेच सेनगाव येथे ७ एकूण १० जणांची तपासणी केली.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये भरती असलेल्या कोविड रुग्णांपैकी २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू आहे़ २ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवले आहे, अशा एकूण ४ रुग्णांवर सद्य:स्थितीत उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोविडचे एकूण ३ हजार ५३६ रुग्ण झाले असून त्यापैकी ३ हजार ४२८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोविडमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 11 new patients of Kovid in the district; So 2 is better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.