मग्रारोहयोवर ११ हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:40 AM2018-05-04T00:40:54+5:302018-05-04T00:40:54+5:30
जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे.
सिंचन विहिरींच्या कामांमध्ये पंचायत समितीनिहाय औंढा १८७, वसमत-३, हिंगोली-१७३, कळमनुरी ९६, सेनगाव-१३९ असे चित्र आहे. यात अनेक तालुक्यांत मागील अनेक दिवसांपासून हीच आकडेवारी समोर केली जात असल्याचेही दिसून येत आहे. मग्रारोहयोची कामे जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींपैकी २0२ ग्रा.पं.मध्येच सुरू आहेत. यात औंढ्यात ५६ गावांत ३८३५ मजूर, वसमतला १0 गावांत १८५ मजूर, हिंगोलीत ४८ गावांत ३२३९ मजूर, कळमनुरीत ४७ गावांत १५७८ मजूर तर सेनगावात ४१ गावांत २२३0 मजूर कामावर आहेत. यामध्ये औंढा-२४६, वसमत-११, हिंगोली-२0५, कळमनुरी-१२६, सेनगाव-१५५ अशी सुरू असलेल्या कामांची संख्या आहे.
जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकूण ३९५२ मस्टर काढण्यात आले. त्यापैकी ६६३ मस्टर पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले. यातील ९५ मस्टरची मजुरी १५ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित राहिली होती. ८२ टक्के मजुरांना वेळेत तर १७ टक्के मजुरांना १५ दिवसांच्या विलंबाने मजुरी मिळाली आहे.