३५ लाखांच्या शेळ्या-मेंढ्यांसह ११ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:03 AM2019-02-17T00:03:00+5:302019-02-17T00:03:08+5:30
जिंतूर-नांदेड महामार्गावरून बेकायदेशीर क्रुरतेने शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पकडून कारवाई ३५ लाखांच्या शेळ्या व मेंढ्यासह ११ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाºया दलालांवर मोठी चपराक बसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : जिंतूर-नांदेड महामार्गावरून बेकायदेशीर क्रुरतेने शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पकडून कारवाई ३५ लाखांच्या शेळ्या व मेंढ्यासह ११ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाºया दलालांवर मोठी चपराक बसली आहे.
खांदेश, जळगाव या भागातून मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करून सदरील प्राणी हैदराबाद, तेलंगना येथे विक्रीसाठी छुप्या मार्गाने नेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सपोनि राहूल तायडे, राहूल बहुरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी सापळा लावला होता. त्यानुसार १६ फेब्रुवारीच्या पहाटे २ वाजता शेळ्या- मेंढ्या घेऊन येणारी एका मागे एक ट्रक, पिकअप अशा छोट्या व मोठी वाहने आढळून आली. या वाहनांमध्ये १०० च्या वर शेळ्या मेंढ्या कोंबलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्या. अवघ्या आर्ध्या तासात ही वाहने एकापाठोपाठ हैदराबादकडे रवाना होत असताना पकडण्यात आल्या आहेत. या वाहनांवर १ हजार १५० एवढ्या शेळ्या-मेंढ्या आढळून आल्या आहेत. याची बाजारपेठेनुसार किंमत काढल्यास ३५ लाख रुपयांची ही जनावरे क्रुरतेने घेऊन जात असल्याचे उघडकीस आले आहे. विदर्भ व खांदेशातून अशा प्रकारची दररोजच तस्करी केली जात आहे. याबाबत औंढा पोलीस ठाण्यात शेख मुश्ताक शेख बशीर (जळगाव), शेख शकील शेख रियाज (धुळे), दीपक शेजवळ (धुळे), आरेफ अब्दुल गणी (अहमदनगर), मुजाहीद खान कसाई (जळगाव), ज्ञानेश्वर कोळी (जळगाव), अब्दुल बुºहाण (जळगाव), वाल्मिकी सोनवणे (जळगाव), राजेंद्र पाटील (अहमदनगर), युसूफ पठाण (अहमदनगर), प्रकाश वाघमारे (जालना) अशा ११ आरोपींविरूद्ध प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्यान्वये सपोउपनि बळीराम जुमडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली ११ वाहने पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करीत आहेत.
या कारवाईमुळे छुप्या मार्गाने प्राण्यांची वाहतूक करणाºया व्यापाºयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दोन शेतकºयांच्या गायी चोरीस; गुन्हा दाखल
४कुरूंदा : वसमत तालुक्यातील सिरळी येथे गुरूवारी रात्रीला गोठ्यात बांधलेली दोन गायी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सिरळी येथील शेतकरी सदानंद नलगे व प्रल्हाद मादळे या दोन्ही शेतकºयांच्या दोन गायी चोरीला गेल्या आहेत. एक गाय ४५ हजार रुपये किंमतीची तर दुसरी गाय २० हजार रुपये किंमतीच्या होती. यापूर्वी याच गावातील दोन बैलजोड्या चोरीला गेल्या होत्या. जनावरांवर पाळत ठेवून रात्रीला वाहनद्वारे चोरून नेऊन परराज्यात विकल्या जाते. अन्यथा विदर्भ व बाहेरच्या बाजारात ही जनावरे विकल्या जाते. यापूर्वी राजवाडी व मरसूळ व बोल्डा येथे गाय चोरीच्या घटना घडल्या होत्या. सिरळी येथे दोन गायी चोरीला गेल्या आहे. फिर्यादी शेतकरी सदानंद नलगे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, अन् त्यात शेतकºयांचे प्रशुधन चोरीस जात आहे. प्रशुधन चोरींच्या घटनांमुळे शेतकरी पशुपालक हैराण आहेत. जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरींच्या घटनां वाढल्या.