औंढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत ११० उमेदवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:19+5:302021-01-03T04:30:19+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतून एकूण ७०४ उमेदवार निवडले ...

110 candidates unopposed in Gram Panchayat election scrutiny in Aundha taluka | औंढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत ११० उमेदवार बिनविरोध

औंढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत ११० उमेदवार बिनविरोध

googlenewsNext

औंढा नागनाथ : तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतून एकूण ७०४ उमेदवार निवडले जाणार असून, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने ११० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये काही ग्रामपंचायतींचा समावेश असून, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिवशी आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात नामनिर्देशन पत्रांची ३१ डिसेंबर रोजी छाननी झाली. या छाननीमध्ये काही गावांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये जवळा बाजार प्रभाग ६ मधून हरिश्चंद्र बापूराव आंबोरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, या जागेवरून तहसील कार्यालयात वाद झाला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याची माहिती आहे. सोनवाडी ग्रामपंचायतीत ७ सदस्य निवडून द्यायचे होते. याठिकाणी शेषराव मुकाडे, गोदावरी जेथे, सुमित्रा बोडखे, बळीराम पुंजाजी खुडे, सुनीता बालाजी पोटे, चंद्रभान सदाशिव बोडखे, पुंजाबाई विठ्ठल काळे यांच्याविरुद्ध एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राजधानी येथे बळीराम कऱ्हाळे, माधव भिकाजी कऱ्हाळे, रेणुका रिठे, पेरजाबाद त्रिवेणी वाघ, सुरवाडी येथे आकाश पारेकर, भीमाबाई घोंगडे, गयाबाई टोम्पे, मुंजाजी कऱ्हाळे, द्वारकाबाई पारेकर, जलालपूर येथे रुक्मिणी मोरगे, सुनंदा मुंडे, पांगरा तर्फ लाख येथे लक्ष्मीबाई हाके, बोरजात महेंद्र पालवे, सावळी येथे बहिणाराव रेखाबाई हाके, जिजाबाई लोखंडे, रुस्तुम धवसे, सखुबाई धवसे, अनुसयाबाई राठोड, वगरवाडीत अनुसया झेंडे, वडचुनात ललिता राठोड, हिवरखेडा येथे नंदाबाई गीते, रेखाबाई गीते, दत्तराव गीते, पंढरीनाथ गीते, कौशल्या गीते, मोहन खिल्लारे, सुमित्रा गीते बिनविरोध निवडून आले आहेत. दुरचूनातून शोभा राठोड, दत्तराव दळवे, बालासाहेब पोले, रंजना जुमडे, गढाळात भाग्यश्री थोरात, सुरेखा थोरात, प्रल्हाद जोजारे, पार्वती पोटे, निशाणा येथील आठ सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये दैवशाला बगाटे, गंगाराम बगाटे, संजय थोरात, वंदनाबाई सावळे, दत्तराव सावळे, संगीता सावळे, संगीता सदाशिव सावळे, नागोराव सावळे यांचा समावेश असून, एका जागेसाठी याठिकाणी निवडणूक होणार आहे. गांगलवाडी येथे विमल दनर, चतुराबाई नाईक, राजापूर येथे शेषराव गुहाडे, अश्विनी गवळी, टाकळगव्हाण येथे मुंजाजी पावडे, गंधारी भारती, कैलाश भारती, संगीता पावडे, कंजारा येथून किशन पाचपुते, चिमेगावमधून विष्णू दराडे, जनाबाई कांगणे, संगीता नागरे, संदीप जायभाय, ब्राह्मणवाडातून रमेश मोरे, नर्मदाबाई बोडके, रेणुकाबाई राठोड, बंडू राठोड, काठोडात शेख लता सत्तार, विनोद राठोड, मीरा जटाळे, अलकाबाई रणखांब, असोंदा महळगाव बुधा हलवाई, सीमा आखरे, पांडुरंग आखरे, मीराबाई शिंदे, जयश्री शिंदे, दुधाळा येथे कलाबाई जटाळे, सुरेखा राठोड, सीताराम राठोड, नालेगाव येथे प्रभाकर विभुते, मनकर्णाबाई विभुते, देवळा तुर्क पिंपरी याठिकाणी सातही सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये गोविंद करे, निर्मलाबाई करे, मंदाबाई करे, शिवगंगा पोले, जगन्नाथ पोले, संदीप शिरसाट, किसनाबाई पोले यांचा समावेश आहे. बोरजा येथे नंदाबाई कामठे, देवाळा तर्फ लाख येथे गंगुबाई शेळके, गंगाराम मासोळकर, अनखळीमधून पंढरी दराडे, सविता ढवळे, नांदखेडा येथे मथुराबाई वावळ, तपोवनमधून ज्ञानेश्वर लोणकर, सविता रासवे, राधाबाई कदम, जनार्दन धामणकर, जामगव्हाण येथे राहुल क्यातमवार, प्रेमा मुकाडे, अरुणाबाई लेकुळे, इंदुबाई पाटील, परमेश्वर मुकाडे, रुक्मिणी आळसे, कमल कारंडे, नवनाथ भिसे, रंजना बोचरे हे नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. लोहारा खु. येथील किसन पोटे, मीराबाई पोटे हे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण ७०४ सदस्यांमधून ११० उमेदवार नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबतची घाेषणा अर्ज मागे घेतल्यानंतर केली जाणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: 110 candidates unopposed in Gram Panchayat election scrutiny in Aundha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.