१०२३ बचत गटांना १.१० कोटींचा फिरता निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:02+5:302021-01-04T04:25:02+5:30
नवीन बचत गट स्थापना संथगतीने यंदा नवीन बचत गट स्थापना अथवा पुनर्गठन करण्यासाठी ३००० एवढे उद्दिष्ट होते. अनेक बचत ...
नवीन बचत गट स्थापना संथगतीने
यंदा नवीन बचत गट स्थापना अथवा पुनर्गठन करण्यासाठी ३००० एवढे उद्दिष्ट होते. अनेक बचत गट पुढे काम सुरू नसल्याने ठप्प असून निदान नवीन बचत गट स्थापन न झाले तरीही पुनर्गठन तरी होणे अपेक्षित असताना त्यातही फारसे लक्ष दिसत नाही. यात हिंगोली- ५४०, कळमनुरी- ६५२, वसमत- ७५८, औंढा- ५१०, सेनगाव- ५४० असे उद्दिष्ट आहे. यात हिंगोली १९८, कळमनुरी ३२०, वसमत २४०, औंढा ३३२, सेनगाव १७२ असे नवीन बचत गट स्थापना व पुनर्गठन झाले आहे. ही टक्केवारी ४२.०७ टक्के आहे. मात्र, यापैकी ऑनलाईन केलेल्या गटांची संख्या कमी आहे. यात हिंगोली ५०, कळमनुरी ६७, वसमत १४५, औंढा १२८, सेनगाव ८१ असे एकूण ४७१ आहेत. हे प्रमाण अवघे १५.७० टक्के आहे.