कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:59 PM2018-04-05T23:59:21+5:302018-04-05T23:59:21+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.

 112 crore of debt waiver | कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.
जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ३८५ शेतकºयांनी कर्ज माफीसाठी अर्ज भरले होते. कर्जमाफीची रक्कम तीन बँकाच्या खात्यावर शेतकºयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत २१ हजार ४० पैकी १९ हजार ७२० शेतकºयांच्या खात्यावर २४ कोटी ६३ लाख ७ हजार ८१४. ३० एवढी रक्कम वर्ग केली आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या १४ हजार ९८ पैकी १० हजार ५३४ शेतकºयांच्या खात्यावर ५६ कोटी ४० लाख १हजार ७३२. ३४ एवढी रक्कम, तर ग्रामीण बँकेच्या ८ हजार ३७४ पैकी ६ हजार २३३ शेतकºयांच्या खात्यावर ३१ कोटी ८० लाख ५६ हजार ३७. ८९ एवढी रक्कम वर्ग केली आहे. असे एकूण ४३ हजार ५१२ पैकी ३६ हजार ४८७ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ६५ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. तर ७ हजार २५ शेतकºयांचे ४७ कोटी ३१ हजार ७६ हजार ७४७. ४६ एवढी रक्कम शिल्लक आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी ३१ मार्च अखेर पर्यंत संबंधित बँकांना प्राप्त झालेली रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांच्या खात्यावर रक्कम अजून वर्ग करण्यात आलेली नाही. या
योजनेंतर्गत केवळ दीड लाखापर्यंतचेच कर्ज माफ होणार असल्याने दीड लाखांच्यावर असलेली रक्कम संंबंधित कर्जदारांने भरल्याशिवाय त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे उर्वरित कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफीचे अर्ज करण्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी १ ते १४ एप्रिल पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली आहे.

Web Title:  112 crore of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.