सिद्धेश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:26+5:302021-09-22T04:33:26+5:30
हिंगोली : गत दोन-तीन दिवसांपासून पूर्णा नदीवर असलेल्या ११ गावांमध्ये पाऊस झाल्यामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले ...
हिंगोली : गत दोन-तीन दिवसांपासून पूर्णा नदीवर असलेल्या ११ गावांमध्ये पाऊस झाल्यामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे तहसीलदारांना कळवून धरणाचे १२ दरवाजे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान उघडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भूषण कणोज यांनी दिली.
औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णा नदीवर वसलेले असून धरणाच्या वरच्या भागातील गावांमध्ये दोन ते तीन दिवसांपासून जोराचा पाऊस पडत आहे. सिद्धेश्वर धरण सद्य:स्थितीत शंभर टक्के भरले असून जिवंत पाणीसाठा ८०.९६ दलघमी एवढा आहे. मंगळवारी पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पूर्णा नदीवरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले.
तहसीलदारांना माहिती दिली
सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातील पाणी मंगळवारी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कृष्णा कानगुले यांना दिली आहे.
-भूषण कणोज, कार्यकारी अभियंता, सिद्धेश्वर धरण.